इंदापूर विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील 149 व दिव्यांग 19 असे एकूण 168 मतदारांचे 9 ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया (होम वोटिंग) पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली.
या कामी इंदापूर मतदारसंघात एकूण 15 पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये एक अधिकारी, एक मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई, एक व्हिडिओ ग्राफर व एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी सचिन खुडे, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांनी तहसील कार्यालय इंदापूर येथे संबंधितांना मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले आहे, असेही डॉ. पांढरे म्हणाले.