पुणे, दि. ४ : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी तीन टप्प्यात उप कोषागार कार्यालय, इंदापूर येथे करण्यात येणार आहे.
या वेळापत्रकानुसार पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे यांनी दिली आहे.