आमदार अपात्रतेचा निर्णय ‘फास्ट ट्रॅक’ होणार; राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता

*मुंबई :-एका वर्षाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आमदार भारतीय जनता पक्षासोबत जाऊन सत्तांतर घडवलं होतं. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने १६ आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती.आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेण्यासाठी सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे.*

*👉🟥🟥👉सुत्रांकडून माहिती मिळालीये की,शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता फास्ट ट्रॅकवर घेण्यात आला आहे. विधीमंडळाकडून मुद्द्यांचा आराखडा तयार करण्याचं काम सुरु करण्यात आलंय, अशीही माहिती समोर येत आहे.ज्या आमदारांवर कारवाईची नोटीस पाठवली होती, त्या आमदारांना कोणते प्रश्न विचारायचे,कशाप्रकारे सुनावणी घ्यायची याची आखणी केली जाणार आहे. ही सुनावणी भारतीय दंड संहितेनुसार घेण्यात येईल. सुनावणीच्या वेळी मुद्दे भरकटू नये याचीही काळजी घेण्यात येईल.*

*👉🟥🟥👉शिवसेनेच्या या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेचं प्रकरण सुप्रिम कोर्टापर्यंत गेला होता. सुप्रिम कोर्टाने निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडून निर्णय घेण्यात उशीर होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या आमदारांनी केला होता. याबद्दल सुनिल प्रभू यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुप्रिम कोर्टाने राहुल नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.*

*👉🔴🔴👉शिवसेनेचे ४० आमदारांच्या भाजपसोबत जाण्याने महाविकास आघडीचे सरकार कोसळले होते. जेव्हा हे आमदार महाराष्ट्रात परत आले, तेव्हा पुरेसं संख्याबळ तपासण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेण्यात येणार होती. मात्र, फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकेरंनी राजीनामा दिला. जर उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा दिला नसता, तर कदाचित सुप्रिम कोर्टातं वेगळा निकाल लागला असता, असे मत काही राजकीय विश्लेषकांनी मांडले होते.*