कोल्हापुरात दहशतवादी?एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात; कोल्हापुरात खळबळ

कोल्हापूर :- स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच एनआयएने कोल्हापुरात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना न सांगता एनआयएने ही कारवाई केली आहे. कोल्हापुरातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तिघांचा नेमका प्लान काय होता? अशी चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे.*

*👉🅾️🅾️👉एनआयएने 5 राज्यात 14 ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यातही पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. राज्यात कोल्हापूर आणि नाशिकमध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे. एकट्या कोल्हापुरातच तीन ठिकाणी छापे मारले आहेत. कोल्हापुरातील कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत एनआयएने छापेमारी केली. पोलिसांना न सांगता अचानक ही छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणी एनआयएने तीनजणांना ताब्यात घेतले आहे. हे तिघे संशयित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा एनआयएचा संशय आहे.*