मुंबई :-:मुंबई पोलिसांनापुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट करण्यात येण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती.*

*👉🛑🛑👉मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?*

*आज सकाळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी फोन करणार्याला कोणती ट्रेन, बॉम्ब कुठे ठेवला आहे, असे विचारले असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही.*

*👉🔴🔴👉पोलिसांना फोन, ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी*

*जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. काही वेळाने फोन करणाऱ्याने त्याचा मोबाईल बंद केला. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.*

*👉🛑🛑👉कोलाबामधील छबाड हाऊसवर सुरक्षा*

*26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या लक्ष्यांपैकी एक असलेल्या छबाड हाऊसचे गुगल फोटो दहशतवाद्यांकडे सापडले आहेत. या दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली. दरम्यान, या घडामोडीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांकडून मॉकड्रीलही सुद्धा घेण्यात आलं.*

*👉🟥🟥👉दोन दहशतवादी एटीएसच्या ताब्यात*

*एटीएसने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. हे दोघेही राजस्थानमधील रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेली होतं. त्याचबरोबर हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा तपासात निष्पन्न सुद्धा झालं आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!