img 20230310 wa0003

संपादकीय

वकिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग हा फक्त पैसे कमावण्यासाठी न करता गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करावा असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले.

इंदापूर वकील संघटनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांच्या सत्कार समारंभ व कायदेशीर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आला होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती येथील मुख्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती दरेकर या होत्या.

व्यासपीठावर इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील साहेब, इंदापूर वकील संघटनेचे कार्यकारणी अध्यक्ष मनोहर साधू चौधरी उपाध्यक्ष जमीर मुलाणी, उपाध्यक्ष सुभाष भोंग सचिव आशुतोष भोसले महिला प्रतिनिधी प्रिया शिंदे मखरे खजिनदार राजू ठवरे ग्रंथपाल रवींद्र कोकरे व सदस्य रुद्राक्ष मनसे उपस्थित होते.

न्यायमूर्ती संजय देशमुख पुढे म्हणाले की, वकिलांनी सातत्याने आपली गुण कौशल्य वाढवावे व कायद्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपावि.

तसेच इंदापूर वकील संघटनेमधून विविध वकील हे सरकारी वकील व न्यायाधीशाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले पाहिजेत व ह्या बारचे व पर्यायाने इंदापूर नगरीचे नाव मोठे केले पाहिजे असे न्यायमूर्ती संजय देशमुख म्हणाले.

वकिली व्यवसाय करताना येणारा ताण-तणाव कसा कमी करायचा याबद्दल न्यायाधीश संजय देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी इंदापूर न्यायालयामध्ये वकील संघटनेकरिता मिळालेल्या नूतन बार रूमचे (विधीज्ञ कक्ष) चे उद्घाटन व लोकार्पण न्यायाधीश संजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी प्रास्ताविक ऍड. के. डी. यादव यांनी केले. तसेच इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष मनोहर चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सचिन चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ऍड. आशुतोष भोसले यांनी मानले.

यावेळी व्यासपीठावर इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष मनोहर चौधरी, उपाध्यक्ष जमीर मुलाणी, उपाध्यक्ष सुभाष भोंग सचिव आशुतोष भोसले महिला प्रतिनिधी प्रिया शिंदे मखरे खजिनदार राजू ठवरे ग्रंथपाल रवींद्र कोकरे व सदस्य रुद्राक्ष मनसे उपस्थित होते.

या कार्यक्रमास माढा, माळशिरस, करमाळा, खडूस, खटाव, फलटण, बारामती, दौंड व पुणे आदी ठिकाणचे न्यायाधीश तसेच याठिकाणच्या वकील संघटनांचे वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदापूर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

चौकट : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख हे इंदापूर येथे आले असता त्यांनी तालुक्यातील कडबनवाडी येथील चिंकारा अभयारण्यास भेट दिली. व याठिकाणी फ्रेंड्स ऑफ नेचर ह्या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या कामाची पाहणी करून त्यांच्या कामाचे कौतुकही केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!