आज आपण ड्रीप संदर्भात चर्चा करणार आहोत … ड्रिपमध्ये मुख्यत साईज *12mm,16mm,20mm*
*Inline आणि online आयएसआय आणि नॉन आय एस आय असे प्रकार आहेत आहे..*
यामध्ये किमतीने स्वस्त असल्याकारणाने जास्त करून *नॉन आयएसआय* प्रकारातले वापरले जाते…
नॉन आयएसआय ड्रीपच्या तुलनेने *आयएसआय ड्रिप हे महाग असल्याकारणाने शेतकऱ्यांचा जास्त कल नॉन आयएसआय ड्रिप वापरण्याकडे आहे……*

आयएसआय आणि नॉन आयएसआय यामध्ये फरक एवढाच असतो की….
आय एस आय ड्रीप चा कालावधी जास्त असतो. जसे की उदाहरणार्थ आयएसआय ड्रीप दहा वर्षे चालत असले तर नॉन आयएसआय ड्रीप तीन पाच सात वर्षे चालते….
नॉन आयएसआय ड्रीप खरेदी करीत असताना….
यामध्ये बंडल वरचे नाव किंवा कंपनी विचारून कधीच खरेदी करू नये… कारण सारख्याच नावाचे ड्रीप सर्व ठिकाणी कॉलिटी मध्ये सारखेच असेल असे होत नाही…. म्हणून म्हणायचं ड्रीप खरेदी करीत असताना आपण स्वतः त्याची क्वालिटी तपासून पहावी… यामध्ये इलॅस्टिसिटी डेन्सिटी फिक्सबिलिटी आणि ग्रॅव्हिटी असे पॅरामीटर असतात
याचा सर्वसाधारणपणे आपल्यालाओढून ताणून चिवटपणा तपासता येतो… दिसायला चमकदार शायनिंग असावी… कमीत कमी चार फुटाचा तुकडा काढल्यास आठ फुटापर्यंत लांबी व्हावी…
लवचिक आणि मऊ असावे…
खरेदी करीत असताना लांबी विचारून खरेदी करावे कारण बाजारामध्ये वेगवेगळ्या लांबीचे बंडल उपलब्ध आहेत…
*बरेच मंडळी शेतकऱ्यांना आमचे ड्रीप बिना फिल्टरचे चालते असे सांगत आहेत यावर विश्वास ठेवू नये…*
कारण मोटर ने कचरा किंवा गाळ ओढल्यास डायरेक्ट ड्रीपर मधून मध्ये जाऊन ड्रीपर चोकोप होतात… कुणाच्याही ड्रीपर मध्ये आलेला कचरा साफ करण्याची कुठलीही व्यवस्था नाही भले आयएसआय असो किंवा नॉन आयएसआय असो म्हणून…
ड्रीप वापरत असताना पाण्यामध्ये क्षार असल्यास कचरा असल्यास *फिल्टरचा वापर करावा…*
बरेच मंडळी आमचे ड्रीप दीडशे फूट दोनशे फूट तीनशे फूट अंतरापर्यंत चालते असे सांगत आहेत यावर विश्वास ठेवू नये….
सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या शेत जमिनीच्या उताराचा विचार करून आणि पाण्याच्या प्रेशरचा विचार करून म्हणजेच मोटर आणि लावलेला प्लॉट याच्या क्षेत्रफळाचा विचार करून प्लॉटची लांबी रुंदी अंतर ठेवावे…
थोडक्यात सांगायचे झाल्यास 16 एमएम चे ड्रीप 100 ते 120 फुटापर्यंतचे एक साईड… म्हणजे 200 ते 250 फूट लांबीच्या प्लॉटमध्ये सबमेन टाकावी …. 20 एम एम मध्ये 120 ते दीडशे फूट एक साईडला म्हणजेच अडीचशे ते तीनशे फूट च्या प्लॉटमध्ये सबमेन टाकावी….
किंवा शक्य असल्यास जेवढे कमी अंतराचे प्लॉट होतील तेवढे जास्त उत्तम राहील…
सबमेन पासून ड्रीप पाईपचे अंतर जास्त लांबीचे ठेवल्यास ड्रीपरची संख्या वाढत जाते आणि जसजसे ड्रीपरची संख्या वाढत जाईल तसतसे पाणी टाकण्याचे प्रमाण वाढत जाते आणि पुढे पुढे ड्रीप पाईप मधील इंटरनल प्रेशर कमी होतो आणि शेवटच्या भागात पाणी पडण्याचे प्रमाण कमी होते…..
प्रश्न फक्त पाण्याचा नसून लिक्विड खतांच्या विषयी बोलायचं झाल्यास आपण एक एकर करिता कमीत कमी तीन किलो ते पाच किलो लिक्विड खतांचा एक वेळ वापर करतो… एकरामध्ये साधारण नऊ हजार ते साडेनऊ हजार ड्रीपर असतात…. तीन किलो खत नऊ हजार ड्रीपर मधून टपकवायचे असेल तर
३०००÷९०००=०.०३३ एवढी खतमात्रा एका ड्रेपरला येते म्हणजे जवळपास लहान मुलाच्या पोलिओ डोस एवढीच म्हणता येईल….
यामध्ये जर आपण ड्रीप पाईप लांब अंतराचा ठेवल्यास खताची मात्रा शेवटपर्यंत पोहोचण्याची शक्यता सांगता येत नाही ते खत सबमेनच्या जवळच पडून जाते शेवटच्या झाडांपर्यंत ते खत पोहचत नाही…
शक्यतो कमीत कमी अंतराचे प्लॉट करावेत आणि सबमेनही शक्यतो प्लॉटच्या मध्यावरतीच वापरावी….
आणि पिकांच्या मुळांचा खोलीचा विचार करूनच पाण्याचे प्रमाण ठेवावे… जेवढे मूळ खोल आहे तिथपर्यंतच आपल्या पाण्याचा ओलावा जाईल याची काळजी घ्यावी… जास्त पाणी झाल्यास जास्त खोल वर ओलावा जातो आणि ते पाणी खोलवर जात असताना आपण दिलेल्या खतांची मात्रा सोबत घेऊन जाते.. म्हणजेच जिथपर्यंत ज्या खोलीवर आपले मूळ जाणार नाही त्या खोलीवर आपले खत जाते.. मी पिकांना दिलेल्या खताचा उपयोग होत नाही…
येतो ही बाब ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त लक्षात घ्यावी…
कारण उसाचे मुळे साईंचा पेक्षा खोल नसते आणि आपण दिलेले पाणी हे कमीत कमी दोन फूट खोलीपेक्षा जास्त ओलावा निर्माण करते… म्हणजेच आपण दिलेले खते दोन फूट खोलीवर जाते आणि उसाचे मुळे सहा इंचावरच असते त्यामुळे आपले खत वाया जाते….
विनाकारण आपल्याला खतांची मात्रा वाढवावी लागते आणि योग्य पोषण तत्त्वे न मिळाल्यामुळे पीक ही रोगांना बळी पडते…
सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे आपण या सर्व बाबींचा विचार करून आपले पीक आणि पाणी नियोजन करावे…

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!