महिला मुलींनो अन्याय सहन करू नका…. अपर्णा जाधव (पोलीस उपनिरीक्षक, इंदापूर पोलीस स्टेशन)….
इंदापूर : आज जागतिक महिला दिन, आपणास शुभेच्छा देताना अानंद होतोय स्पर्धेच्या युगात आपण प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आहोत. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना कधीकधी आपल्यावर अन्याय होतो किंबहुना वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते, अशा वेळी खचून न जाता प्रतिकार करा , अन्याय सहन करु नका असा महत्वपूर्ण सल्ला अपर्णा जाधव, पोलीस उपनिरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना दिला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की शैक्षणिक क्षेत्रात विविध प्रकारच्या विदयार्थी दशेत असणाऱ्या मुलींनी आपल्या करियरसाठी झटून रात्रंदिवस अभ्यास करा, आई वडिलांचे व नातेवाईकांचे स्वप्न पूर्ण करा व स्वावलंबी बना. स्वताच्या पायावर उभे राहिल्यास आपणाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो.
जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला ,मुली व मातांना हार्दिक शुभेच्छा.