शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. संदेश शहा यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
इंदापूर :- येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन इंदापूर आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगी शंकरराव
पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा होते.
यावेळी कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा म्हणाले, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व निरा भिमा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोड कामगारांसाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर या ठिकाणी सुरु करण्यात आले. राज्यातील या प्रथम पथदर्शी प्रकल्पात सुमारे ८ हजार ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटूंबाची मोफत तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मताई भोसले यांनी सुरू केलेल्या या उपक्रमास माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची अनमोल साथ मिळाली.त्यामुळे यंदा पुन्हा हे केंद्र सुरू केले असून त्यामध्ये प्राथमिक तपासणी करून योग्य ते उपचार व औषधे दिली जाणार आहेत. कारखान्याचे गाळप चालू हंगामापर्यंत ही सुविधा ऊसतोड मजुरासाठी मोफत सेवा दिली जाणार आहे. तसेच मजुराच्या कुटुंबातील लहान मुलांवर देखील औषधोपचार केले जाणार आहेत. यावेळी ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर म्हणाले, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रमार्फत फिरता दवाखाना आठवड्यातून सहा दिवसाकरिता असणार आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, मदतनीस व इतर टीम कारखाना परिसर, शेतकऱ्यांच्या शेतात जिथे ऊसतोड मजूर काम करतात किंवा राहतात अश्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविणार आहेत.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, माजी उपाध्यक्ष भागवत गटकुळ, नगरपरिषद गटनेते कैलास कदम, माजी सरपंच गोपीचंद गलांडे, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर, जय नर्सिंग चे अध्यक्ष जयंत नायकुडे,आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण ,आरोग्य केंद्र व्यवस्थापक भारत बोराटे, आरोग्य केंद्राचे डॉ. मनोज शिंदे, डॉ. श्वेता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार , विलास गाढवे, धनंजय कळमकर, देविदास राखुंडे उपस्थित होते. सुत्रसंचलन महादेव चव्हाण, भारत बोराटे व दीपक जगताप यांनी केले.
फोटो १) : शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन करताना डॉ. संदेश शहा, भरत शहा, भागवत गटकुळ.
२) महादेव चव्हाण व भारत बोराटे यांच्या सत्कार प्रसंगी मान्यवर.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!