इंदापूर पत्रकार संघाच्या वतीने ‘बाळशास्त्री जांभेकर समाजरत्न पुरस्कार’ वितरणाचे आयोजन

इंदापूर :

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर पत्रकार संघाच्या वतीने आज दि.६ रोजी जानेवारी पंचायत समिती हाॅल येथे  ‘बाळशास्त्री जांभेकर समाजरत्न’ म्हणून  जनसेवक, समाजसेवक,पत्रकार मित्र तसेच कोरोना फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून काम केलेल्या व्यक्तींना राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा ह्या असणार आहेत.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, पुणे जिल्हा बँकेचे नूतन संचालक अप्पासाहेब जगदाळे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, वैद्यकीय अधिकारी डाॅ.एकनाथ चंदनशिवे,नायब तहसीलदार अनिल ठोंबरे,गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता किशोर साळुंखे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, इंडियन मेडिकल असोसिएशन चे तालुकाध्यक्ष डाॅ. अविनाश पाणबुडे, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष धरमचंद लोढा तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका वृषाली नवगिरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, डॉ. विकास शहा, डाॅ. संदेश शहा, मधुकर गलांडे व पत्रकार ज्ञानेश्वर रायते हे उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत.

तरी या कार्यक्रमाला अधिकाधिक पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जेष्ठ पत्रकार महेश स्वामी, धनंजय कळमकर व दीपक खिलारे यांनी केले आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!