जय भवानी गड विकास प्रतिष्ठान , लाखेवाडी मध्ये भव्य तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न”*

नमोन्युजनेशन संपादकीय

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान चे सचिव . माननीय श्री. हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आंतरशालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तालुक्यातील 95 शाळांमधून जवळपास 200 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये
घेण्यात आली.
गट -अ पहिली ते चौथी
गट ब- पाचवी ते आठवी
गट क- नववी ते बारावी
अशा गटातून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे विजेते विद्यार्थी खालीलप्रमाणे
गट अ- १)अनन्या अमोल बाळापुरे -प्रथम
२) राजरत्न संजय कांबळे -द्वितीय
३) प्राजक्ता आबासो मारकड -तृतीय
४) अद्वित अमर घोगरे.उत्तेजनार्थ
गट ब- १) सरिस्का अभिजित बावळे – प्रथम
२) रणवीर उमेश मोहिते – द्वितीय
३)प्रथमेश नाईक निबाळकर – तृतीय
४) जगदीश सुनिल पडसळकर – उतेजनार्थ
गट क- १) सुमित संतोष गरगडे – प्रथम
२)प्रतिक सुनिल चव्हाण – द्वितीय
३)ओम किशोर शिंदे – तृतीय
४)रोहित बाळू भोसले – उत्तेजनार्थ

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच सर्व सहभागी विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष. मा. श्री श्रीमंत ढोले( सर) यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद दिला. तर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना इतर बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन कला गुणांचा विकास करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे सचिव. हर्षवर्धन खाडे सर यांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळा विषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार.मा.प्रदीप गुरव सर( मा. गटशिक्षण अधिकारी) उपस्थित होते.
“तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा” यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासक श्री. गणेश पवार सर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य. श्री खेडकर सर, सुपरवायझर सौ. रेखा सुरवसे , श्री. निखिल मुळे. स्पर्धा विभाग प्रमुख. श्री बांगर सर, लता कचरे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!