शिवशाही शेतकरी संघटनेने उपोषणाचा ईशारा देताच तहसीलदारांचा धडाकेबाज निर्णय,तलाठ्यांना लेखी आदेश-नितीन दादा आरडे

शिवशाही शेतकरी संघटनेने उपोषणाचा ईशारा देताच तहसीलदारांचा धडाकेबाज निर्णय,तलाठ्यांना लेखी आदेश-नितीन दादा आरडे
नमोन्युजनेशन:- रामवर्मा आसबे

इंदापूर:-तलाठी शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नसलेबाबत या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि . २६ जानेवारी २०२२ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत असलेबाबत नितिन ( दादा ) आरडे , अध्यक्ष शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक ११/०१/२०२२ रोजीचे निवेदन रोजी निवेदन तहसीलदार कार्यालयात प्राप्त झाले असून सदर निवेदन मध्ये त्यांनी दिनांक २६/०१/२०२२ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत असलेचे नमुद केलेले आहे . तरी याबाबत आपले तरी दिनांक २६/१/२०२२ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यापासून परावृत्त करणेत यावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आसा आदेश तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी काढला आसल्याची माहीती नितीन आरडे यांनी दिली, या वेळी बोलताना आरडे म्हणाले की,तलाठी सजावरील तलाठ्यांच्या उपस्थितीबाबत जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यालयामध्ये तलाठी उपस्थित असणेबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्याची अमंलबजावणी करणेत यावी . १. तलाठी कर्मचारी यांनी त्यांचा नियोजित दौरा / बैठका याबाबत कार्यालयाच्या आवारात सूचना फलक लावावा . २. तलाठी यांनी कार्यालयाच्या आवारात तलाठयांची कर्तव्ये / जबाबदा – याबाबत सूचना फलक लावावा . ३. तलाठयांनी आपला दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल , अशा स्वरूपात कार्यालयाच्या आवारात लावावा , तसेच लगतचे संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसिलदार यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत . ४. ज्या सजांच्या ठिकाणी तलाठी / मंडळ अधिकारी यांना शासनाने निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत , त्यांनी त्या निवासस्थानामध्ये राहावे . ५. सेवा हमी कायदयाअंतर्गत नमूद सेवा विषयक बाबीची ( विविध प्रकारचे उतारे लागणारा कालावधी इ . तपशील ) माहिती कार्यालयाच्या आवारात लावावी . ६. तलाठी कर्मचारी यांनी शेतजमीनी , पिकपहाणी करताना संबंधित शेतजमीनीस भेटीबाबतचा तपशील जाहीर करावा . ७. तलाठी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाजा करिता ठेवू नये . ८. विविध दाखले देताना , शासनाने आकारलेले वाजवी शुल्क याबाबतची दरसूची कार्यालयाच्या आवारात लावावी,आसा लेखीआदेशतहसीलदार( श्रीकांत पाटील ) तहसिलदार , इंदापूर यांनी काढल्या मुळे नितीन आरडे यांनी या निर्णायाचे स्वागत केले,