अभाविप इंदापूर शाखेकडून एसटी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय विरुद्ध महाराष्ट्र सरकार विरुद्ध जाहीर निदर्शने

अभाविप इंदापूर शाखेकडून एसटी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय विरुद्ध महाराष्ट्र सरकार विरुद्ध जाहीर निदर्शने*
महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी आज बंद आहे. मागील काही वर्षापासून एस टी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्य सरकार मध्ये सामावून घेण्याच्या व इत्यादी अशा विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेक वेळी राज्यात आंदोलने देखील झाले आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन देखील राज्य शासनाकडून दिले गेले परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. गेल्या चार दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूकी संदर्भात गैरसोय होत आहे. आज दिनांक 11 नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत विद्यार्थी बस पास काढून प्रवास करत,अनेक वाडी-वस्ती व गावात प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. योग्य त्या मागण्या धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे मागणी पत्र अभाविप इंदापूर शाखेतर्फे मा. तहसीलदार साहेबांना देण्यात आले. आणि एसटी कर्मचाऱ्यांना देखील पूर्णपणे पाठिंबा देण्यात आला. झोपलेले राज्य सरकारच्या विरोधात आज तहसील कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली, त्याच बरोबर शिवाजी चौक येथेदेखील राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी निर्दयी राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अभाविप इंदापूर तालुका प्रमुख भरत आसबे, शहर मंत्री अवधूत बाचल, सहमंत्री ओंकार हिंगमिरे, आंदोलन प्रमुख सुरज खामगळ, स्वप्नील भंडलकर, श्रीकांत चिंगळे, शेखर गुजर प्रतीक रेडके इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.