कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी”हिरालाल पारेकर”बिनविरोध!

पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वपूर्ण व शेतकऱ्यांची संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजवडी (इंदापूर)येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना च्या 21 जागे करीता 21अर्ज आल्याने संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्याचे प्रशासनाने आज जाहीर केले.

भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातील जागेवर वनगळी येथील हिरालाल पारेकर यांची बिनवरोध निवड झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

हिरालाल पारेकर हे वनगळी गावचे रहिवासी असून त्यांनी बिजवडी ग्रामपंचायत चे सरपंच,सदस्य तसेच वनगळी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे

त्यांच्या निवडीचे कौतुक सर्वत्र होत आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!