नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर सहा गुन्हे*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कोविड-19 विषयक नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून आयोजकांवर सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलघर पोलिसांनी आज ही माहिती दिली.*

*👉राणेंची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी पालघरमध्ये आली होती. त्यावेळी कोविड-19 विषयक नियम आणि प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केल्याबद्दल माणिकपूर, तुलिंज, काशिमीरा, वालिव, वसई आणि विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.*

*👉या यात्रेच्या आयोजकांवर भारतीय दंड संहिता, साथरोग प्रतिबंधक कायद्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही,असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!