शिवशाही शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार चळवळ उभा करणार नितीन आरडेसहकातात समृध्दी कोणाची 20 व्या शतकात महाराष्ट्र मध्ये सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली एक क्रांतीच झाली त्या क्रांतीचा गवगवा देशभर करण्यात आला सहकारातून समृद्धीकडे विना सहकार नही उद्धार अशी उतरणे लिहून सहकारी चळवळ उभी केली गेली अर्थात याचे प्रवर्तक हे नेहमीच सत्ताधारी जमातीतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके-विमुक्त इतर मागास जाती अल्पसंख्यांक हे यामध्ये कुठेच नव्हते पण नंतर प्रवर्तकांच्या लक्षात आले अरे हे ही उत्पादक आहेत सहकार कायद्यातील नवीन तरतुदीनुसार सर्वांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळाले परंतु हे प्रतिनिधित्व केवळ नामधारी साखर कारखान्यात काय चाललंय दूध डेअरीत काय चाललंय कृषी उत्पन्न बाजार समितीत काय चाललंय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा काय चाललंय दूध संघात काय चाललंय सहकारी बँकेत काय चाललंय हे यातील कोणत्याही प्रतिनिधीला कधीच माहीत नव्हते असे म्हणायला वाव आहे कारण सहकारामध्ये ज्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली ते नेहमी प्रवर्तककांचे नियंत्रण असलेले लोक होते भले ते कोणत्याही वर्गातून आले असले तरी त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण झाले सहकारी कायद्यामुळे प्रत्येक सहकारी संस्थेला दर वर्षी ताळेबंद द्यावा लागतो त्या ताळेबंद तिला कडे एवढे मोठे असतात व मांडणी इतकी जटील असते कि ती सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे असते त्यामुळे सर्वसाधारण सभासदाला त्या संस्थेत नेमके काय चालले आहे हे कधीच समजत नाही व समजावून घ्यायचा प्रयत्न केला तरी कोणीही समजू देत नाही सहकाराच्या नावाखाली पन्नास वर्ष गेल्यानंतर प्रवर्तकांच्या वारसांनी संस्थांच्या जोरावर खाजगी संस्था उभारल्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आलेल्या पैशातून शिक्षण संस्था उभारल्या व त्या माध्यमातून सभासदाच्या नातवंडांना लाखोच्या फी घेऊन शिक्षण द्यायचा धंदा सुरू केला म्हणजे एका बाजूला सभासद असलेला शेतकरी सहकाराच्या माध्यमातून सहकारी संस्थांमध्ये लुटला गेला तर त्यात सहकारी संस्थांच्या पैशातून उभारलेल्या खासगी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्याची उर्वरित पुंजी ही हडप करण्यात आली

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!