*शेतकरयांनी भुरट्या सावकारांच्या दबावाला बळी पडू नये- आत्महत्या करू नये* नितीन आरडे संस्थापक अध्यक्ष शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
नुकतच इंदापूर तालुक्यात एका कुख्यात सावकाराने शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिंवत जाळल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात भयभीत झालेल्या सावकारग्रस्त शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक व सर्व सामान्य नागरिकांनी भुरट्या सावकाराच्या कोणत्याही धमक्याला व दबावाला बळी पडू नये. असे आव्हान शिवशाही शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन आरडे.. यांनी केले अाहे.
पुर्वीच्या काळी सावकारी करणारे भामटे सावकार व्याज वसुल करण्यासाठी कर्जदाराच्या घरी जावून पेटत्या चुलीत पाणी ओतून व्याजबटा वसुल करुन सर्व सामान्य गरीब अज्ञानी असणार्या जनतेला वेठीस धरत अासत.
आत्ताच्या काळात सावकारग्रस्तांचे अपहरण करणे,जबरी मारहाण करणे त्याचबरोबर अकाऊंट पे पैसे देवून त्याबदल्यात कोरे चेक घेणे,हात उसण्या पैशाचा बनाव करत नोटरी करणे, बँकांचे कर्जाचे बोजे असलेल्या जमीनी कायम खुश खरेदी खत करणे, ताबा वहिवाटीस अडचणी येवू नये यासाठी विशिष्ट समाज्यातील मर्जीतल्या व्यक्तीच्या नावे जमीनी खुष खरेदी करणे.त्याच जमीनीवर लाखो रुपये पतसंस्था काढून कर्जदार असल्याचा बनाव रचणे यासारखे कारनामे करून भविष्यात कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी पक्की बांधणी करून या भुरट्यासावकारांनी सावकारी प्रतिबंधक कायदा २०१४ ला आव्हाहन दिले आहे.. म्हणूनच “धरलं तर चावतयं सोडलं तर पळतयं “अशी अवस्था सावकारग्रस्ताची झाली आहे..त्यात सर्वात जास्त फटका शेतकरी वर्गाला बसला असून शेतकरी खचला आहे.गरजवंताला अक्कल नाही म्हणून अव्वाच्या सव्वा द.म.द.शे चक्रीवाढ व्याज लावण्याचा अधिकार भुरट्या सावकारांना नाही.७/१२ मधील इतर हक्कात बँकांचे कर्जाचे बोझे असताना झालेले हस्तांतरण व नोंदी हे सावकारीतुन झालेले हस्तांतरणच आहे.खाजगी सावकारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संबंधित बँका व प्रशासन यांनी सुमोटो लक्ष घालून संबंधित सावकारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. प्रशासनाने परवानाधारक सावकार व त्यासंबंधीची नियमावली जाहीर करणे गरजेचे आहे.तसेच शेती उत्पादनातुन होणारी प्रचंड लुटच सावकारी पाशाला जबाबदार असल्याने शेतकऱ्यांनी यापुढे कथेतील शेपटासारखे सावकारांना वर्षानुवर्ष प्रतीमाह व्याज देण्याचे बंद करून झालेल्या जुलमी अन्यायाच्या विरुद्ध आसुड घेवून भुरट्या सावकारांना फोडून काढून सावकारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणे गरजेचे आहे.पण खचून जावून आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये..शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष
नितीन आरडे -पाटील
