📍📍📍📍📍📍📍
*स्तु ती चा झ ट का*
📍📍📍📍📍📍📍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माणूस स्वभावतः स्तुतीप्रिय आहे.
आपली केलेली किंवा झालेली स्तुती आवडत नाही, असा माणूस फार विरळ आहे.
*स्तुती ऐकायला गोड वाटत असली,*
*तरी धोकादायक असते.*
त्यामुळे ज्या ठिकाणी आपली स्तुती होते,
त्या ठिकाणी आपण
सतर्क आणि सावधान व्हायला हवे.
🏛️🏛️🏛️🏛️🏛️
👤स्तुती ऐकणारा माणूस पूर्णपणे मानसिकदृष्ट्या, स्तुती करणाऱ्याच्या आहारी जातो.
👤स्तुती करणाऱ्याला एकदा याची खात्री पटली, की स्तुती ऐकणाऱ्याला तो बळीचा बकरा करतो.
*या जगात निर्हेतुक आणि निःस्वार्थी स्तुती फक्त _आई_ आपल्या लेकराची करत असते,*
_ते तिचे *मातृप्रेम* असते, *मातृत्व* असते आणि *तेच देवत्व असते*._
⛳उपनिषदांनी मातृत्वाला
देवत्व संबोधून नमस्कार केला आहे.
*मा तृ दे वो भ व !*
याचा अर्थ निःस्वार्थी आणि निर्हेतुक स्तुती
एखाद्या व्यक्तीची करण्यासाठी
*आपल्या अंगी देवत्व यावे लागते*.
त्याशिवाय हे शक्य नाही.
💎💎💎💎💎
🎭 स्तुती आवडणारा
सामान्य मानव आहे .
🎭स्तुती न आवडणारा
विरक्त आणि वैरागी आहे.
🎯निर्हेतुक आणि निःस्वार्थी स्तुती करणारा
देव आहे.
🎭आपले स्वतःचे आत्मपरीक्षण केले असता,
आपल्याला हेच दिसून येते, की
*आपण स्वार्थाशिवाय आजपर्यंत*
*कोणाचीही स्तुती केलेली नाही.*
😇प्रसंगानुसार स्तुती करणे,
📍एक तर आपला नाईलाज असतो
📍किंवा ते अपरिहार्य असते
📍किंवा आपला निव्वळ तो स्वार्थ असतो.
⛳ _पारमार्थिक जीवनामध्ये त्यामुळेच स्वतःची स्तुती स्वतः आपल्या कानाने ऐकणे निषिद्ध समजलेले आहे_.
स्वतःची स्तुती स्वतः करणे
मूर्ख लक्षण समजले आहे.
*आपण आज पर्यंत असा मूर्खपणा बऱ्याच वेळेस केलेला आहे.*
💦💦💦💦💦💦
⁉️ स्तुती किती घातक असते⁉️
याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे अफजलखान.
⛓️शिवरायांचे वकील अफजलखानाला भेटायला गेलेल्या पहिल्या भेटीपासून ते शिवरायांच्या भेटीपर्यंत त्याची स्तुतीच करत होते.
⛓️ स्तुती ऐकून ऐकून अफजलखान बेभान झाला, त्याचा विवेक संपला आणि शिवरायांच्या वकिलाच्या तो मानसिकदृष्ट्या पूर्ण कब्जात गेला.
⛓️प्रतापगडावर एकट्याने शिवाजीराजांना भेटायला यायला तो कबूल झाला आणि
⛓️शिवरायांनी चातुर्याने या स्तुतिसुमनांचा धूर्तपणे वापर करून, त्याला आपल्याला ज्या प्रमाणे, ज्या स्थळी पाहिजे, तसा फिरविला आणि आपला कार्यभाग पार पाडला.
_स्तुती न दिसणारे शस्त्र आहे, परंतु ते तलवारीपेक्षा जास्त परिणामकारक आणि घातक आहे._
आपला शत्रू आपल्यापेक्षा वरचढ असेल, तर त्याला _गनिमी कावा_ म्हणून हे वापरता येते आणि _स्वतःसाठी आत्मघातकी शस्त्र_ समजून कायमचे दूरही ठेवता येते.
आपल्या धूर्तपणावर आणि वापरावर
याचा परिणाम अवलंबून आहे.
⛳ *अनेकांची स्तुती आम्हा ब्रम्हहत्या l*
*एका वाचुनी त्या पांडुरंगा ll*
*आम्हा विष्णुदासा एकविध भाव l*
*न म्हणो त्या देव आणिकासी ll*

◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!