📍📍📍📍📍📍
💎 *स्वभावाची स्वच्छता*💎
📍📍📍📍📍📍
आपल्या स्वतःच्या स्वभावातील दोष
शक्यतो लवकर माणसाच्या लक्षात येत नाहीत.
आपल्या जवळची माणसे
🎭 आपल्यावर प्रेम करत असल्यामुळे,
त्या दोषांकडे दुर्लक्ष करतात आणि
🤦🏽‍♂️परकी माणसे त्यात त्यांचे काहीच
नुकसान नसल्यामुळे दुर्लक्ष करतात.
*आपल्यावर सर्वात जास्त लक्ष,*
*आपल्यावर जळणाऱ्या, आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या, आपल्याशी इर्षा व मत्सर करणाऱ्या*
*माणसाचे असते.*
➖ही आपल्या भोवतालची माणसे,➖
आपल्यात दोष शोधत असतात,
त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये.
*त्यांच्या निदर्शनाला आलेला दोष खरा असतो कारण त्या दोषाचे भांडवल करूनच आपल्याला ते बदनाम करत असतात.*
⛳तुकोबारायांनी *निंदकाचे घर असावे शेजारी l* असे जे म्हटले आहे, त्यामध्ये अतिशय गूढ अर्थ आहे.
➖आपली मानसिकता,➖
👹निंदा करणाऱ्या माणसाला
टाळणारी असते आणि
😷त्याची संगत किंवा शेजार
आपल्याला कधीच हवासा वाटत नाही.
⛳तूकोबारायांच्या दूरदृष्टीतून पाहिले, तर
वर वर्णन केलेली सगळी माणसे
आपली निंदा करणारी असतात.
🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩
_कोणतीही निंदा करण्यासाठी दोष शोधावा लागतो, त्याशिवाय ती करता येत नाही, म्हणून_
*नेहमी निंदा करणारा काय बोलतोय⁉️*
*त्याच्याऐवजी तो कशा विषयी बोलतोय ⁉️*
याकडे आपले लक्ष असावे.
⛳ _दासबोधात समर्थ सांगतात, माणसाच्या स्वभावातील दोषच त्याच्या जीवनातील येणाऱ्या संकटाचे कारण असतात_.
_आपल्या जीवनात संकट आणि अडचण येऊ नये, असे प्रत्येकाला वाटत असते._
_त्यासाठी तो आयुष्यभर प्रयत्न करत असतो, ✊🏾निकराची लढाई देत असतो, परंतु आयुष्यातील सर्व संकटाचा पराभव करणे त्यांना शक्य होत नाही._
याचे कारण संकट किंवा अडचणी
ज्या कारणाने तयार होत असते,
ते कारण आपण बाहेर शोधत असतो.
➖ _आपल्या स्वभावातील दोष_ ➖
_आपल्याकडून नेहमी दुर्लक्षित होतो, म्हणूनच_
_तो संपत नाही, म्हणूनच_
_संकटे आणि अडचणी संपत नाहीत._
➖ _आपल्या स्वतःच्या स्वभावातील दोष,_➖
_आपल्या स्वतःला काढण्यासाठी_
_अंतर्मुख होऊन, स्वतःचे परीक्षण_
_करावे लागते_.
🎭माणूस नेहमी दुसऱ्याचे परीक्षण करतो,
त्यामुळे त्याला दुसऱ्यातील दोष दिसतात.
*आपण स्वतः स्वभावाने निर्दोष असल्याशिवाय*
_◼️दुसऱ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही,_
_◼️सेवा करू शकत नाही आणि_
_◼️परोपकारही करू शकत नाही._
➖या तिन्ही क्षेत्रातील सदोष सेवा➖
आपल्याला केलेल्या कामाचे
समाधान मिळू देत नाही.
*आपण ज्या दिवशी _दुसऱ्याचे दोष शोधणे_ बंद करू, त्याच दिवशी _आपण स्वतःतील दोष_ शोधायला सुरुवात करतो.*
➖ *ही प्र क्रि या* ➖
✈️ *मन शुद्धिची* आहे,
✈️ *चित्त शुध्दीची* आहे,
✈️ *अंतःकरण शुद्धीची* आहे आणि
✈️ *अंतिमतः आत्मशुद्धीची* आहे,
या प्रक्रियेसाठी जीवनात साधना असावी.
*साधनेशिवाय या मार्गावर*
*आपले पाऊलही पडू शकत नाही.*
➖ या चा अ र्थ ➖
_साधना जीवनात नसेल, तर आपल्या स्वभावातील दोष जगातील कोणत्याही उपायाने संपविता येत नाहीत,_
त्याला कोणतेही औषध उपलब्ध नाही
आणि पुढेही होणार नाही.
🦩 *संग सज्जनाचा उच्चार नामाचा l*
*घोष कीर्तनाचा अहर्निशी ll*
🦩 *तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे l*
*तोच ज्ञान लाहे गु रु कृ पा ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292714.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!