📍📍📍📍📍📍📍📍📍
💎 *मौल्यवान काळ* 💎
📍📍📍📍📍📍📍📍📍
_या विश्वात नव्याने काही येत नाही_ आणि
_यातील काही बाहेर जात नाही,_
हा _नैसर्गिक_ नियम आहे, तसाच
तो _परमार्थिक_ नियमही आहे.
ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे,
जे निर्माण झालेले आहे, ते नाश पावणार आहे.
⛳ *उपजे ते नाशे l नाशिले पुनरपि दिसे ll*
*हे घटिका यंत्र जैसे l परिभ्रमे गा ll*
_जे निर्माण झालेले नाही,_
_ते नाशही पावणार नाही,_
_तेच नित्य आहे आणि तेच सत्य आहे._
*या जगात सत्य तत्व हेच नित्य आहे.*
त्याला कोणी |प|र|म स|त्य म्हणते,
कोणी प|र|मा|त्मा म्हणते,
कोणी स|त्य|ना|रा|य|ण म्हणते,
कोणी वि|श्वं|भ|र म्हणते,
तर कोणी |खु|दा| म्हणते.
*सत्य तु सत्य तु सत्य तु विठ्ठला l*
👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️
💀 कोरोना, म्यूकर मायकॉसिस आणि पाठीमागे होऊन गेलेले अनेक रोग आणि त्याला कारण ठरणारे बुरशी, विषाणू आणि जीवाणू हे विश्वाचाच एक भाग आहे.
💀 ते निर्माण झाले असतील,
तर त्यांना मृत्यू निश्चित आहे,
हे नाश पावणारे आहेत.
_भविष्यात अजूनही असेच बरेच काही विषाणू आणि जीवाणू, तसेच काही रोगजंतू निर्माण होतील आणि नाश पावतील,_
ही नैसर्गिक आणि वैश्विक प्रक्रिया आहे.
💀संपूर्ण मानव जातीला वेठीला धरणारे आणि घातक असणारे, हे जीवजंतू असल्यामुळे मानव जातीच्या अस्तित्वाचाच प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होतो.
_अशा भयानक वेळी जे अनित्य आहे,_
_परंतु आज घातक आहे, अशा गोष्टीकडे_
_माणसाचे मन, चित्त आणि बुद्धी_
_एकाग्र होते_ आणि
जे आढळ सत्य आहे,
त्याकडे दुर्लक्ष होते.
*_अनित्य_ जसेजसे घातक होत जाते, तसे तसे माणसाची वृत्ती जास्तीत जास्त _बहिर्मुख_ होत जाते.*
ही बहिर्मुखता फक्त दुःख देत असते,
यात काही सुखाचे क्षण आले, तरी
ते क्षणिक असतात,
ते आपल्याला सर्वसुख, शाश्वत
किंवा कायमचे सुख देऊ शकत नाहीत.
*शाश्वत सुखाचा शोध हा फक्त*
*_अंतर्मुख_ होण्यानेच लागत असतो* आणि
*हे अं त र्मु ख हो णे*
*अध्यात्म किंवा परमार्थाशिवाय शक्य होत नाही*
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
आपण जन्माला आलोय,
याचा अर्थ मरणार निश्चित आहोत . त्यामुळे
_पंचमहाभूतांचा, काही काळासाठी भाड्याने घेतलेला हा देह, पंचमहाभूतांना परत करण्यासाठी निसर्ग काहीतरी निमित्त शोधत असतो_.
ते निमित्त म्हणजे
आपल्या 💀मृत्यूचे कारण असते.
💣थोडक्यात आजचा कोरोना, म्यूकर मायकॉसिस किंवा तत्सम रोग आहेत, हे निसर्गाचे नियोजन आहे.
💣 कितीही प्रयत्न केला तरी नैसर्गिक आपत्ती, नुकसान केल्याशिवाय रहात नाही.
💣या नाहीतर त्या, कोणत्यातरी वावटळीत आपला हा पंचमहाभूतांचा देह पडला आणि पाडला जाणार आहे, हे निश्चित आहे.
🙏🏻 *मग देह पडण्यापूर्वीचा*🙏🏻
*आपल्या हातात असलेला हा काळ*
*अतिशय मौल्यवान/अमूल्य आहे.*
या काळाचे सोने करणे आपल्या हातात आहे.
🎯 *या काळात जास्तीत जास्त _अंतर्मुख_ होऊन, आपल्यातील _दिव्यशक्तीचा अनुभव_ घ्या,*
✊🏾 *ती शक्ती जागृत करा आणि ती शक्ती*✊🏾
*आपले आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी,*
*समाजकार्यासाठी, धर्मकार्यासाठी*,
*राष्ट्रकार्यासाठी पुरेपूर वापरा.*
➖➖लक्षात ठेवा➖➖
आपल्या हातात काळ
अतिशय थोडा आहे.
_आपली विकेट पडण्यापूर्वी आपल्या कर्तृत्वाचे चौकार आणि षटकार यांचा पाऊस आपल्याला पाडता आला पाहिजे._
⛳ *क्षणोक्षणी हाचि करावा विचार l*
*तरावया पार भवसिंधु ll*
*नाशवंत देह जाणार सकळ l*
*आयुष्य खातो काळ सावधान ll*
🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞
