📍📍📍📍📍📍📍
🎭 *मूर्खत्वाचा अंत* 🎭
📍📍📍📍📍📍📍📍
आपल्या जीवनातील मूर्खपणा,
आपण स्वतः शोधून संपवणे,
हे शहाणपणाचे लक्षण आहे, तसेच
_ते आपल्या आत्मशुद्धीसाठी व व्यवहारिक चातुर्यासाठी नितांत गरजेचे आहे._
🤦🏽♂️दुर्दैवाने आपण आपला शहाणपणाच नेहमी
मिरवत असतो, दाखवत असतो,
प्रगट करत असतो.
त्यामुळे *आपला मूर्खपणा नेहमी आपल्या नजरेआड होतो किंवा केला जातो*.
😷आपला मूर्खपणा, आपल्यावर शुद्ध प्रेम करणाऱ्या माणसाने दाखविला, तर आपण त्या माणसाचा आदर केला पाहिजे.
🤦🏽♂️दुर्दैवाने आपण त्याच्यावर चिडतो आणि त्यालाच उलट म्हणतो, “मी एवढं चांगलं केलेलं तुला दिसत नाही ⁉️” “आणि नेमकं नको तेच कसं तुझ्या लक्षात आलं ⁉️”
*आपला मूर्खपणा कधीच झाकत नाही.*
🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️
ज्यांना आपण सुधारावे असे वाटत असते, ते लोक आपल्याला तो दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात.
*जे लोक आपल्या मूर्खपणाला खत पाणी घालतात, ते लोक निश्चित _👹घातकी_ असतात.*
आपल्या मूर्खपणाचा गैरफायदा घेण्यासाठी ते संधीची वाट पाहत असतात.
🤦🏽♂️दुर्दैवाने स्वतःला शहाणी समजणारी माणसे नेहमी अशा धूर्त लोकांचे बळी ठरतात.
*समाजाने शहाणा ठरवलेला,*
*_खरा शहाणा_ असतो,*
*स्वतःने स्वतःला शहाणा ठरवलेला*
*_मूर्ख_ असतो.*
👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️👁️🗨️
🎓खरोखरच स्वतःला सुधारायची इच्छा
प्रत्येक व्यक्तीची असते.
🎓ज्याला सुधारायचे आहे, त्याने
स्वतःतील मूर्खपणा शोधायला सुरुवात करावी.
🎓आपण *आत्मपरिक्षण* केल्याशिवाय
आपल्याला हे कळत नाही.
🎓 *आत्मपरीक्षणाची सवय ही खरी*
*माणसाच्या शुद्धीची प्रक्रिया आहे.*
💎आत्मपरीक्षणासाठी
जीवनात *साधना* असावी.
💎साधनेने माणूस
*अंतर्मुख* होतो आणि
💎अंतर्मुख होणाराच
*आत्मपरीक्षण* करू शकतो,
💎आत्मपरीक्षण करणारा पुढे
*आत्मनिरीक्षण* करतो आणि
💎तो पुढे *आत्मपरिवर्तन* करतो व
💎 तोच पुढे *आत्मज्ञानी* होतो.
*जीवनातील आत्मज्ञानी अवस्था*
*ही आपल्या सर्व मूर्खपणावरचा विजय असतो.*
_जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत आपण कोणत्या तरी क्षेत्रात निश्चित मूर्ख असतो, त्यालाच काही लोक अज्ञानी असे नाव देतात._
_समर्थ रामदास स्वामी म्हणतात,_
⛳ *विद्या वैभव ना धन l*
*पुरुषार्थ सामर्थ्य ना मान l*
*कोरडाच वाहे अभिमान l*
*तो येक मूर्ख ll*
⛳ *जैसे जैसे करावे l तैसे तैसे पावावे l*
*हे जयास नेणवे l तो येक मूर्ख ll*
🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
🎓🎓🎓🎓🎓🎓
📞मो.नं.9822292713.📞
