शरणागतीतील धोका

शरण आलेल्याला माफ करावे !
असा संकेत आहे, परंतु
त्यातही शरणागतीची प्रामाणिकता
तपासली पाहिजे अन्यथा
_ही शरणागती, शरण देणाऱ्याच्या जीवावर_
_उठल्याशिवाय रहात नाही._
👁️‍🗨️शरण येणाऱ्यांची शरणागती
तपासायचे भान, शक्यतो
शरण देणाऱ्याला राहत नाही.
🎓शरण देणारा वरचढ ठरल्यामुळे
आपल्या विजयाच्या मस्तीत दंग असतो.
🎓 *अशा काळात त्याची विवेक बुद्धी नष्ट झालेली असते, त्यामुळे तो बेसावध असतो,*
👹शरण येणारा धूर्त, कावेबाज असेल,
तर ती वेळ तो नाटकीपणाने मारून नेतो,
परंतु झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचे
ठरवूनच तो संधीची वाट पहात राहतो,
*संधी मिळताच अतिशय सूडबुद्धीने*
*शरण देणाऱ्याचा तो बदला घेतो.*
याला इतिहास साक्षी आहे.
_हे मर्म फक्त शिवरायांसारख्या अखंड सावधान_
_असणाऱ्या माणसालाच समजले,_
बाकीचे अजूनही अगदी आपल्यासहीत
यातून बाहेर निघालेले नाहीत.
💣💣💣💣💣💣💣💣💣💣
⚔️ _पृथ्वीराज चौहाणांनी मोहम्मद घौरीला_ शरण आला, म्हणून अनेक वेळा सोडून दिले. फितुरीने पृथ्वीराज चौहाण ज्यावेळी कैद झाले , त्यावेळी महंमद घौरीला, आपण त्याला शरण येताच माफ केले होते, याचे स्मरण करून दिले. त्यावेळी महंमद घौरीने दिलेले उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे,
👹 मोहम्मद घौरी म्हणाला *” तू मूर्ख आहेस ! शत्रूला माफ करून सोडून देण्याचा मूर्खपणा तू केलास ! मी तो करणार नाही ! “* आणि त्याने पृथ्वीराज चौहाणांचे डोळे काढले .
⚔️ इतिहासातील दुसरे उदाहरण म्हणजे, _बहलोलखानाला सरसेनापती प्रतापराव गुजर_ यांनी असेच शरण येताच सोडून दिले. शिवरायांना ही चूक समजली आणि त्यांनी प्रतापराव गुजरांना खरमरीत खलिता पाठविला, त्यात लिहिले होते *”खानास गर्दीस मिळवणे अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे ! “*
या पत्रातील कडक भाषेने प्रतापराव गुजर बेभान झाले आणि केवळ सहा अंगरक्षकांनीशी त्यांनी नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाशी झुंज दिली, त्यावेळी _बहलोलखानाने त्याच्यावर केलेल्या शरणागतीच्या उपकाराची परतफेड 😓सूड घेऊनच केली आणि सरनोबत प्रतापराव गुजर यांचे अमर बलिदान झाले._
_आज व्यवहारी जीवनात *शरण आलेल्याला माफ करण्यासाठी शिवरायांचा आदर्श* आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे_.
अखंड सावधान असलेले शिवाजीराजे
याबाबतीत कधीच चुकले नाहीत.
💲💲💲💲💲
*_वेळ आल्यानंतर नाईलाज म्हणून शरण आलेला शत्रू_ , हा आपल्या जीवनातील सर्वात जास्त घातक शत्रू असतो कारण*
त्याच्या मनात सूडाची भावना
अखंड पेटलेली असते आणि
आपल्या मनात त्याच्याबद्दल
दया असते व
दयेपोटी आपण बेसावध असतो.
0️⃣0️⃣0️⃣0️⃣0️⃣
*शरण आलेल्याची शरणागती म्हणजे*
⁉️नाईलाज आहे ⁉️ का
⁉️हे त्याचे खरोखर समर्पण आहे ⁉️
याची खात्री केल्याशिवाय
कधीच माफ करू नये,
हे खरे श हा ण प ण आहे.
⚔️अफझलखानाला मारल्यानंतर त्याच्या सेनेतील काही कडवे पठाण, शिवरायांना शरण आले.
⚔️शिवरायांनी त्यांची खात्री करून त्यांना माफ केले आणि आपल्याच सेनेत दाखल करून घेतले.
⚔️हे सर्व पठाण शिवरायांशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले आणि शिवरायांसाठी प्राणपणाने त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढले.
➖➖➖➖➖➖
😷शरणागतीतला धोका😷
भल्याभल्यांना समजला नाही,
समजत नाही.
🎯तो समजण्यासाठी🎯
⚔️ _शिवरायांसारखा युगपुरुष_ आणि
⛳ _श्रीकृष्णासारखा जगद्गुरु_
_आपला कायम आदर्श असला पाहिजे._
*निश्चयाचा महामेरू l*
*सकल जनांसी आधारु l*
*अखंडस्थितीचा निर्धारु l*
*श्री मं त यो गी ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞 मो.नं.9822292713.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!