img 20260410 wa0001img 20260410 wa0001

राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी किरण गोफणे यांची निवड

संपादकीय

राष्ट्रीय समाज पक्षाने प्रदेश कार्यकारणी नुकतीच जाहीर केली असून त्यामध्ये इंदापूर येथील किरण गोफणे यांची प्रदेश सरचिटणीस या पदावरती निवड झाली आहे. याचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जाहीर केले आहे. या निवडीच्या निमित्ताने एका निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाने चांगली संधी दिली. यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किरण गोफणे यांनी २००५ पासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये इंदापूर शहराध्यक्ष, इंदापूर तालुका अध्यक्ष, माढा व करमाळा

विधानसभेचे निरीक्षक, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, पुणे जिल्हा अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून समर्थ पणे जबाबदारी पार पाडली आहे.

आता रासपाच्या प्रदेश सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली आहे. गेले सुमारे २१ वर्ष पक्षाध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या विचारांचा पाईक असणाऱ्या किरण गोफणे यांनी इंदापूर तालुका तसेच जिथे जिथे जबाबदारी मिळेल तिथे प्रामाणिकपणे काम पार पाडलेले आहे. पक्षात निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला जातो असे या निवडीद्वारे सिद्ध झाल्याचे मत पुणे जिल्हा अध्यक्ष तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे यांनी व्यक्त केले आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!