img 20260804 wa0041img 20260804 wa0041

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते मा.जयकुमार भाऊ गोरे यांच्यावरती मागच्या दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवराळ भाषेचा वापर करत अवमानकारक वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ आज पळसदेव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला.

 

शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा असलेला हा महाराष्ट्र आहे,स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा घालून दिलेला आहे.परंतु केवळ भाषणापुरता यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगून प्रत्यक्षात मात्र त्या वारशाला तिलांजली देण्याचं काम संजय राऊतांसारखी माणसं करतायत.याऊलट ज्या जयकुमार भाऊंवरती संजय राऊत यांनी खालच्या पातळीवरचे वक्तव्य केलं ते जय कुमार भाऊ मूल्यधारीत राजकारणाच्या चौकटीत राहून या महाराष्ट्राला असलेल्या पुरोगामी विचारांची कास धरुन,त्या विचारांना प्रामाणिक न्याय देण्याचं काम करत आहेत.राष्ट्रहिताचं काम करणाऱ्या जयकुमार भाऊं सारख्या नेत्यावरती अशा पद्धतीची वक्तव्य करून महाराष्ट्रातील माथी भडकवण्याचं,अन् महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची गरिमा संपवण्याचा काम संजय राऊत करत आहेत.ते काम त्यांनी वेळीच थांबवायला हवं.राजकारणात क्षणिक टाळ्या मिळवण्यासाठी आणि वर्तमानपत्राचे रकाने भरण्यासाठी बोलणं सोपं असतं,परंतु जनमानसात आपलं व्यक्तित्व सिद्ध करायला आयुष्य खर्च करावं लागतं.या गोष्टी लक्षात घेऊन संजय राऊत यांनी पुढील राजकारण करावं, यापुढे जर त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करणं टाळलं नाही आणि वारंवार जयकुमार भाऊंच्या बाबतीत किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याच्या बाबतीत अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली तर अजून तीव्र पद्धतीचं आंदोलन त्यांच्या विरोधात उभं करू असा इशारा आयुष्मान भारत आघाडीचे पश्चिम मंडलचे अध्यक्ष मा.छगन दादा बनसुडे यांनी दिला.

 

यावेळी मा.जि.परिषद सदस्य हनुमंत नाना बनसुडे,भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मा.महेंद्र भाऊ काळे,आयुष्मान भारत आघाडी इंदापूर तालुका अध्यक्ष कु.छगन दादा बनसुडे, पश्चिम मंडल चे पदवीधर अध्यक्ष प्रा.सुधीर करगळ सर,भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल चे युवा मोर्चा अध्यक्ष कु.विवेक काळे, युवा नेते तुषार चव्हाण,धनंजय बनसुडे, रामदास बनसुडे,लक्ष्मण बनसुडे,बापूराव बनसुडे,योगेश जगताप, सतीश बनसुडे, लक्ष्मण बनसुडे, सुहास माने, अक्षय बनसुडे, वैभव शिंदे , सुनील शिंदे, महेश बनसुडे,अमित बनसुडे इ. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!