img 20250328 wa0006img 20250328 wa0006

विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन

 

दिनांक 28 मार्च 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर येथे माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. एम. संदीकर व माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक प्राध्यापक सुदर्शन आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री बाळराजे शरद झोळ व उपाध्यक्ष म्हणून प्रसाद आबासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच शुभम महादेव ननवरे याची खजिनदार पदी व अविनाश विकास पवार याची सचिव पदी निवड करण्यात आली. तसेच विनोद रामचंद्र पवळ, ओमकार बाळासो खबाले, प्रणव पांडुरंग कवितके, ओकार सतीश गलांडे, निरंजन देविदास खराडे, शोयब सिकंदर मोमीन व सहदेव भराटे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर यांनी नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. सुदर्शन आवटे यांनी यापूर्वी झालेल्या टाटा स्ट्राइक च्या माध्यमातून घेण्यात आलेला स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शिबिर, गेस्ट लेक्चर, मेडिकल कॅम्प अशा सर्व कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी बी सी ए विभागाचे विभाग प्रमुख प्रा. निलेश काळदाते व बी. कॉम. चे विभाग प्रमुख जे. पी. राजेभोसले इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदरील माजी विद्यार्थी संघटनेचा महाविद्यालयाच्या भविष्यातील वाटचालीस मोठी मदत होणार आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!