img 20250219 wa0009img 20250219 wa0009

*नवी दिल्ली:-दिल्ली विधानसभेत भाजपने आम आदमी पक्षाचा मोठा पराभव केला आहे. दरम्यान उद्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. त्याआधी म्हणजेच आज भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अखेर दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या आहेत. भाजप आमदार रेखा गुप्ता यांची विधिमंडळ गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. उद्या रेखा गुप्ता या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर परवेश वर्मा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.*

 

*👉🟥🟥👉दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली, त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे, त्या उद्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची माहिती देत रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. भाजपाने पोस्ट करत म्हटले की, दिल्ली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगती करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.*

 

*👉🔴🔴👉तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपला सत्ता मिळाली आहे, भाजपनं आपच्या या गडाला सुरुंग लावत सत्ता काबीज केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत सस्पेंस कायम होता. त्यानंतर पक्षाचे निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदावर कोण असावं? यावर दिल्लीच्या आमदारांसोबत वन टू वन चर्चा केली. त्यानंतर आज भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्याकडे आता दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची सुत्रं असणार आहेत. भाजपसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे, कारण तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!