दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी विद्या प्रतिष्ठान वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इंदापूर येथील माजी विद्यार्थी संघटनेने राज्य परिवहन महामंडळ इंदापूर आगार येथे जाऊन अर्ज देऊन विनंती केली की विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय ते बस स्थानक इंदापूर यामधील अंतर ३ ते ४ किलोमीटर असून महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांना रोज ३ ते ४ किलोमीटर चालत प्रवास करावा लागत आहे व तसेच खुळे चौक ,महादेव नगर मध्ये साधारण 2000 लोकांची लोक वस्ती वास्तव्यास आहे. सदर खुळे चौकातून विद्यार्थी, कामगार,व्यापारी वर्गाची वर्दळ असते. अनेक शाळा कॉलेजाकडे जाणारा मार्ग या चौकातून जातो. एवढे असून सुद्धा इंदापूर ,अकलूज,बारामती मार्गाच्या जाणाऱ्या बसेस सदर चौकातून ये जा करत नसल्यामुळे सर्वांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. बस थांबा नसल्यामुळे रात्री अपरात्री प्रवास करणे अवघड होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी इंदापूर आगार यांना अर्जाद्वारे सर्व बसेस सदर महाविद्यालय समोर व खुळे चौकामध्ये बस थांबा बनवण्यात यावा अशी मागणी केली असून परंतु मागणीस म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही तर लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करू अशी रोखठोक भूमिका संघटनेचे सचिव निरंजन देविदास खराडे सदस्य ओंकार सतिश गलांडे व शुभम महादेव ननवरे यांनी आगरी व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ इंदापूर येथे जाऊन आगार व्यवस्थापक यांच्याकडे अर्जाद्वारे केली. त्यावेळी उपस्थित अनिताताई खरात (संस्थापक अध्यक्ष तेज पृथ्वी फाउंडेशन ग्रुप ) सामाजिक कार्यकर्ते,बंडू दडस, भागवत घनवट,श्रीमंत बंडगर, दिलीप कुंभार, राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र तानाजी शिंगाडे , राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष नवनाथ कोळेकर आधी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

