चेतना फाउंडेशनच्या चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये बुधवार (ता.3) रोजी सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव विलास भोसले सर व खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित राहिले. उपस्थित पाहुण्यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच स्कूलच्या प्राध्यापिका प्रांजली मॅडम व फौजीया मॅडम यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे विचार अतिशय उत्कृष्टरित्या मांडले.