चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
चेतना फाउंडेशनच्या चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे सोमवार ( ता.12) रोजी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम, चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चा प्रिन्सिपल इन्चार्ज प्रियंका पारेकर मॅडम व चेतना इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्रिन्सिपल इन्चार्ज कैलास खबाले सर उपस्थित होते . महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सौ.माधुरी लडकत, खबाले मॅडम आणि कल्याणकर मॅडम उपस्थित राहिले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सौ माधुरी लटकत मॅडम यांनी सर्व महिलांना महिलांनी स्वावलंबी कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की ‘ ‘महिलांनी सर्व गोष्टी शिकल्या पाहिजेत. कधीच कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या वरती अवलंबून राहिले नाही पाहिजे. प्रत्येक महिलेने स्वावलंबी झाले पाहिजे’. तसेच कल्याणकर मॅडमनी सर्व महिलांना आरोग्य विषयक सुविधांविषयी माहिती दिली व एक प्रेरणादायी कविता म्हणून सर्व महिलांचा उत्साह वाढवला. तसेच हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांजली सुतार यांनी केले. सूत्रसंचालन फौजिया पठाण यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षदा चौधरी यांनी केले.