da480c8f97b34d2bbe46eb50f571a0c5
इंदापुर:-

 

ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर व डॉक्टर सुहास शेळके यांच्या संयुक्तमानने आज आरोग्य शिबिर आयोजित केले होते कार्यक्रमाचे सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली संघाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब घाडगे सर यांनी डॉक्टर शेळके यांचा सत्कार केला कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठांचे नवीन ओळखपत्र तयार केले त्याचे वाटप केले व या महिन्यात यांचा वाढदिवस होता त्यांचा सत्कार करण्यात आला माजी अध्यक्ष श्री नंदकुमार गुजर यांनी मनोगत व्यक्त केले डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या 70 सभासदांची कान घसा नाक याची मोफत तपासणी केली त्याबद्दल मनापासून आभार मानले स्वतःच्या व्यवसायातून वेळ देऊन आज ज्येष्ठशी तपासणी करणे हे सामाजिक कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे केले हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या ज्येष्ठांना सवलतीच्या दरात तपासणी करू हे आश्वासन डॉक्टरांनी दिले कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष भानु दास पवार खजिनदार काशिनाथ जगताप संचालक छाया जाधव श्री अशोक गानबोटे हरीभाई गुजराती चव्हाण सर जगतापबापू डॉ चिकने कांबळे मॅडम उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री सुभाष महाजन सर यांनी केले

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!