img 20230901 wa0001
एन. ई . एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर मधील विद्यार्थिनी कु. तन्वी अजिनाथ दळवी जिल्हास्तरीय कुस्ती साठी निवड

——————————————-

क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा मा मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे पार पडल्या यामध्ये एन. ई . एस . हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर मधील एकोणीस वर्ष वयोगटात मधील कुमारी तन्वी अजिनाथ दळवी इयत्ता अकरावी मधील 59 वजनगटा मध्ये प्रथम क्रमांक मिळवला तिची निवड जिल्हा पातळीवर झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे, सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे. प्राचार्य चंद्रकांत गोपाळ रणवरे, पर्यवेक्षक खरात सर विभाग प्रमुख बोंद्रे सर ज्येष्ठ शिक्षक किसवे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या क्रीडा शिक्षक हनुमंत सर चव्हाण सर मुलाणी सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!