छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

पुणे, दि. ११ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड नाशिक येथे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ५४ चे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी २५ सप्टेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.

उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे २५ स्प्टेंबर पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी ५४ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) किंवा ९१५६०७३३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएसबी५४ हा संदेश केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन देण्यात येईल.

अधिक माहीतीसाठी उमेदवारांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

00000