चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरा

img 20230523 wa0010(1)
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 6 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान कृष्णाचा जन्मदिवस. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. भारतात गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी येथे हा सणाला फार महत्त्व आहे. त्यामुळे देशभरात जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सण उत्त्साहात साजरा केला जातो.
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे जन्माष्टमीचा हा दिवस खूप आनंदात साजरा केला गेला .या कार्यक्रमाच्या वेळी मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा. सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित होते. स्कूलच्या प्रिन्सिपल मा.निकिता माने मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगितली.
या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी राधा कृष्णाचे वेशभूषा परिधान करून आले होते. शाळेसमोर एक छोटीशी मटकी बांधण्यात आली होती.सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली आणि सर्वात शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.