चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे हिंदी दिन उत्साहात साजरा

img 20230523 wa0010(1)
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे हिंदी दिन उत्साहात साजरा

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या 2 वर्षांतच म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने हिंदी भाषेची भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 14 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा. सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर उपस्थित होते .स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपण हिंदी दिन का साजरा करतो? याबद्दल माहिती दिली. नंतर स्कूलच्या प्राध्यापिका प्रांजली मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. आज या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये हिंदी कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या हिंदी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. व शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.