*मेथी*
औषध एक – गुण अनेक
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-२५ वा*
(१ला रविवार फेब्रुवारी २०२१)
*मेथी*
औषध एक – गुण अनेक

मेथी आमटी-भाजीच्या फोडणीसाठी रोज वापरली जाणारी वस्तू आहे. वैज्ञानिकांच्या मते मेथी मध्ये एक प्रकारचे तेल आणि फॉस्फरिक ऍसिड असते त्याचा वातनाडीवर चांगला प्रभाव पडतो म्हणजेच वातनाशक औषधी म्हणून तिचा वापर केला जातो
*वैशिष्ट्ये-* मेथी वायूला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे त्याच बरोबर ती वातहारक, उष्ण, कडवट व पौष्टिक असते. मेथी मुळे पोटातील जंत,शूळ, गोळा, संधिवात , कमरेचे दुखणे, चमका येणे इत्यादी विकारावर फायदा होतो. मेथी वायुनाशक समजली जाते. मेथीच्या भाजीत रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे ती थोडी कडू असल्यामुळे कित्येकांना आवडत नाही परंतु तिचे गुण व उपयोग लक्षात घेता मेथी खाण्याची सवय केली पाहिजे
*उपयोग-*
*१)* थंडीच्या दिवसांमध्ये मेथी खाणाऱ्याला वायु चा त्रास होऊ नये म्हणून मेथीचे लाडू बनवून खावेत.
*२)* मेथी स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे स्त्रियांचा अशक्तपणा दूर होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो.
*३)* मेथीच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने मलावरोध दूर होतो ,रक्त शुद्ध होण्यास मदत होते व मूळव्याधीमध्ये फायदा होतो.
*४)* मेथी चूर्ण, गुळ व तूप एकत्र करुन सकाळ-संध्याकाळी चावून खाल्ल्याने स्त्रियांना प्रदररोगात चांगला फायदा होतो.
*५)* मेथीच्या भाजीचा रस कात व खडीसाखर एकत्र करून पिल्याने बहुमुत्रतेचा विकार दूर होतो.
*६)* मेथी, सुंठ व हळद चूर्ण एकत्र करून ३कप पाण्यात १ कप होईपर्यंत उकळून पिल्याने वात रोगावर ती फायदा होतो.
*७)* रोज रात्री एक चमचा मेथी काचेच्या ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवावे सकाळी ती मेथी बराच वेळ चावून-चावून खावी. नंतर ते पाणी प्यावे त्यामुळे मधुमेह दूर होतो.
*८)* मेथीची सुखी भाजी थंड पाण्यात भिजत ठेवावी चांगली भिजली की ती पाण्यातच कुस्करावी नंतर ते पाणी गाळून त्यामध्ये थोडा मध घालून पिल्याने उन्हामुळे झालेला त्रास कमी होतो
*९)* मेथीचे दाणे अथवा पाने बारीक वाटून लेप केल्यामुळे वण्राचा दाह किंवा सूज कमी होते.
*१०)* १चमचा मेथी पावडर व १चमचा मध एकत्र करून रात्री चाटण करावे त्यामुळे थेंब थेंब पडणारी लघवी बंद होते (हा प्रयोग ४-५ दिवस करावा)
*११)* मेथी,खारीक, खोबरे,डिंक, सुंठ आणि गूळ यांचे लाडू बनवून जेवणाआधी सकाळी- संध्याकाळी खाल्ल्यामुळे वात विकारा बरोबरच शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.

पुढील रविवारी *सुंठ-* औषध एक गुण अनेक

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!