*ओवा*
*औषध एक – गुण अनेक*
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-२७ वा*
( ३रा रविवार फेब्रुवारी २०२१)

घरगुती औषध म्हणून ओव्याचा उपयोग प्राचीन काळापासून होत आहे व पाचक रुची वाढवणारा गरम तिखट हलका जठराग्नी प्रदीप्त करणारा वायू पोट फुगणे यावर गुणकारी असतो याशिवाय ओवा वातनाशक,ताणनाशक, कृमीनाशक व दुर्गंधहारक आहे

*गुणधर्म* घरगुती औषध म्हणून ओव्याचा उपयोग प्राचीन काळापासून होत आहे व पाचक रुची वाढवणारा गरम,तिखट, हलका,जठराग्नी प्रदीप्त करणारा वायू , पोट फुगणे यावर गुणकारी असतो याशिवाय ओवा वातनाशक,ताणनाशक, कृमीनाशक व दुर्गंधहारक आहे.

*उपयोग* एक लिटर पाण्यात एक चमचा ताजा ओवा घालून उकळावे. निम्मे पाणी शिल्लक राहिल्यावर थंड करुन गाळावे व प्यावे. हे पाणी वात व कफ दोषांमुळे उत्पन्न झालेल्या सर्व रोगांवरील अत्यंत लाभदायक उपचार आहे. याचे नियमित सेवन केल्याने हृदयशूल, पोटातील वायू, पोट फुगणे, पोटातील गोळा, उचकी, अरुची, मंदाग्नी, पोटातील कृमी, पाठदुखी, अजीर्णामुळे होणारे जुलाब, कॉलरा, सर्दी, बहुमूत्रता, डायबिटीज यासारख्या अनेक रोगांमध्ये अत्यंत लाभ होतो, हे पाणी उष्ण प्रकृतीचे असते.परंतु पित्त प्रकृतीसाठी हानिकारक आहे
*१* ओवा , हळद , दालचिनी प्रत्येकी पाव चमचा, अर्धा चमचा सुंठ आणि मनुके १० हे १ग्लास पाण्यात अर्धा होईपर्यंत उकळून त्यामध्ये चवीनुसार गुळ मिसळून सकाळी, संध्याकाळी जेवणाआधी घेतल्याने वातविकारावर लाभ होतो.
*२* ओवा, सुंठ, लसूणआणि मेथी यांची पावडर एरंडेल (सरसो) तेलमध्ये मिसळून गरम करुन मालिश केल्याने वातविकारामध्ये चांगला उपयोग होतो.
*३* संधीवात, आमवात यामध्ये ओवा १ चमचा,सुंठ पावडर अर्धा चमचा व पारिजातकाची ५पाने एकत्र करून याची चटणी बनविणे हे मिश्रण १ ग्लास पाण्यात उकळून पाणी अर्धा ग्लास झाले कि सकाळी जेवणाअगोदर पिणे.
*४* ओवा १चमचा आणि काळे तिळ २चमचे यांची पावडर करुन आणि ४चमचे गुळ पावडर सोबत एकत्र करावे आणि सकाळी संध्याकाळी १-१चमचा खाल्ल्याने वातविकारावर फायदा होतो.
*५* ओव्यापासून तयार केलेले अमृतधारा २-२थेंब कोमट फुलपात्रभर पाण्यात टाकून पिणे यामुळे संपूर्ण व अर्ध डोकेदुखी थांबते.
*६* ओवा खाल्ल्याने
शीतज्वराच्या थंडीचा जोर कमी होतो,घाम येतो आणि ताप उतरतो.
*७* ओवा,खसखस, पिंपळी आणि अडुळशाची पाने याचा काढा घेतल्यामुळे कफज्वर व कफाचा खोकला बरा होतो.
*८* ओव्याचे फुल दिवसातून तीन वेळा तूप व मधाबरोबर एकत्र करून घेतल्याने कप कमी होऊन खोकला बरा होतो
*९* ओवा तव्यावर भाजून तेवढ्याच प्रमाणात सैंधव मीठ एकत्र करून हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने पोटातून गॅस कमी होतो
*१०* बाळंतीण स्त्री ला ओवा खायला घातल्याने तिची पचनक्रिया सुदृढ बनते ताप येत असल्यास तो बरा होतो व तिला अंगावर दूध चांगले येते
*११* रात्री एक कप पाण्यात एक चमचा चुन्याची निवळी व अर्धा चमचा ओवा भिजत घालावा सकाळी हे पाणी गाळून काही दिवस पिल्याने स्रियांना श्वेतप्रदरामध्ये फायदा होतो

पुढील भागात रविवारी *जिरे:औषध एक -गुण अनेक*

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!