*सुंठ*
औषध एक – गुण अनेक
🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक
*ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🍉🍍🍑🥐🍅🥒🍇
*चळवळ आरोग्याची*
*भाग-२६ वा*
(२रा रविवार फेब्रुवारी २०२१)
*सुंठ*
औषध एक – गुण अनेक

सुंठ आमटी-भाजीत रोज वापरली जाणारी वस्तू आहे. आले उन्हात वाळवून त्यापासून सुंठ तयार करतात.सुंठ पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. वृद्धावस्थेत पचन क्रिया साधारणत: मंद बनते पोटात वायू निर्माण होतो, कफ प्रकोप होतो ह्रदयात धडधड होते, पाय दुखतात या स्थितीत सुंठीचे चूर्ण अथवा दुधात सुंठ टाकून घेणे फायदेशीर असते. कफ व वाताच्या सर्व विकारात तसेच हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त असते
*वैशिष्ट्ये-* सुंठ रुची उत्पन्न करते आमवाताचा नाश करणारी असून ती पाचक ,तिखट हलकी स्निग्ध व उष्ण आहे. सुंठ कफ ,वायू व मलबंध दूर करणारी वीर्यवर्धक व स्वर उत्तम करणारी आहे.सुंठ उलटी, श्वास ,खोकला हृदयरोग, हत्तीरोग, सूज, मुळव्याध,दमा,धाप लागणे,अपचन, शरीर थंड राहणे,डोके दुखी,पोट फुगणे व पोटात वायू धरणे या विकारावर अत्यंत गुणकारी असते
परंतु पित्तप्रकृती असणाऱ्यांना सुंठ फायदेशीर ठरत नाही.
*उपयोग-*
*१)* सुंठ व आवळा यांचे योग्य प्रमाण घेऊन तयार केलेले आरोग्य पेय दिवसातून २ ते ३ वेळा पिल्याने शरीरामध्ये ऊर्जा नियम निर्माण होऊन थकवा दूर होतो.
*२)* सुंठ अर्धा चमचा व मुलेठी एक चमचा ३ कप पाण्यात १ होईपर्यंत उघळून सकाळ संध्याकाळी पिल्यास रक्त वाढीसाठी उपयुक्त असते.
*३)* सुंठ,मेथी, हळद, यांची पावडर समप्रमाणात घेवून १ चमचा १ ग्लास पाण्यात उकळून अर्धा झाला दररोज सकाळी , संध्याकाळी जेवणा आधी घेतल्याने वातविकारावर अत्यंत गुणकारी आहे. (हाय बी पी असेल तर त्यामध्ये अर्जुनसाल आणि मानसिक ताणतणाव, झोप लागत नसेल तर अश्वगंधा , शतावरी पावडर मिसळावी. )
*४* अर्धा चमचा सुंठ,पाव चमचा प्रत्येकी ओवा,हळद ,दालचिनी, मनुके १० हे १ग्लास पाण्यात अर्धा होईपर्यंत उकळून त्यामध्ये चवीनुसार गुळ मिसळून सकाळी, संध्याकाळी जेवणाआधी घेतल्याने वातविकारावर लाभ होतो.
*५* सुंठ,लसूण, ओवा,आणि मेथी यांची पावडर एरंडेल (सरसो) तेलमध्ये मिसळून गरम करुन मालिश केल्याने वातविकारामध्ये चांगला उपयोग होतो.
*६* संधीवात, आमवात यामध्ये सुंठ पावडर अर्धा चमचा, ओवा १ चमचा व पारिजातकाची ५पाने एकत्र करून याची चटणी बनविणे हे मिश्रण १ ग्लास पाण्यात उकळून पाणी अर्धा ग्लास झाले कि सकाळी जेवणाअगोदर पिणे.
*७* सुंठ पावडर १/२ चमचा, मुठभर निर्गुडीची पाने ३कप पाण्यात १कप होईपर्यंत उकळणे सकाळी संध्याकाळी पिणे.(सायटिका साठी)
*८* संधिवात किंवा आमवात साठी सुंठ पावडर १/२ चमचा १ग्लास पाण्यात अर्धा ग्लास होईपर्यंत उकळणे नंतर त्यामध्ये २ते३चमचे एरंडेल तेल ( मेडिकल मधील नको घाण्याचे आवश्यक ) टाकून रात्री झोपताना पिणे.(आठवड्यातून १किंवा३दिवस)
*९* सुंठ,दालचिनी व खडीसाखर एकत्र करून त्याचा काढा पिल्याने सर्दी नाहीशी होते
*१०)* सुंठ, मेथी, खारीक, खोबरे,डिंक आणि गूळ यांचे लाडू बनवून जेवणाआधी सकाळी- संध्याकाळी खाल्ल्यामुळे वात विकारा बरा होऊन शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.
*११* सुंठ, हीमज व नागरमोथा यांचे चूर्ण समप्रमाणात घेऊन त्यामध्ये गूळ दुप्पट घालून हरभऱ्या एवढ्या गोळ्या बनवून दिवसातून तीन वेळा घेतल्याने खोकला व दम या हे विकार दूर होतात
*१२* सुंठ व गुळ गरम पाण्यात कालवून त्याचे थेंब नाकात घातल्याने उचकी थांबते.
गोमूत्र व गरम पाण्याबरोबर रोज सुंठ घेतल्याने हत्तीरोग बरा होतो.
*१३* सुंठ व वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतात.
*१४* सु़ंठ पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचे नस्य केल्याने किंवा कपाळावर त्याचा लेप लावल्याने अर्धशिशी बरी होते.
(सुंठ पावडर,आरोग्य पेय, वेदनाशामक चूर्ण, एरंडेल तेल,अर्जुनसाल यासाठी संपर्क-९०४९०४७७३६)
👉योग्य आहार, दिनचर्या यासंबंधीचे नियम आणि योग-प्राणायाम या संबंधीत माहिती साठी संपर्क करा.
पुढील रविवारी *ओवा* औषध एक गुण अनेक

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmai.com
🙏👇🌹🙏👇🌹🙏👇

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!