प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

*प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे, दि. २१ : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार (पीएमआरबीपी), 2024 करिता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्वतःच्या जीवाला धोका असताना अतुलनीय धैर्याची आणि प्रतिकूल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित परिस्थिती विरुद्ध धाडसाने केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल तसेच स्वतःला किंवा समाजासाठी गंभीर धोक्याच्या वेळी मानसिक शक्ती, तीव्र व शीघ्र बुद्धी आणि समय सूचकता अशी अपवादात्मक कृती करणाऱ्या बालकांना त्यांच्या शौर्यासाठी बाल पुरस्कार दिला जातो. त्याचप्रमाणे खेळ, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्कारासाठी बालक (मुलगा/मुलगी) भारतीय नागरिक आणि त्यांचे वय १८ वर्षेपर्यंत असावे. अर्जदार बालक हा पूर्वी कोणत्याही क्षेत्रातील समान पुरस्कार (मंत्रालयाने यापूर्वी प्रदान केलेल्या अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कारासह) मिळालेला नसावा. https://awards.gov.in किंवा www.wcd.nic.in या संकेतस्थळावर पुरस्कारासाठी बालकाचे नामांकन करावे, असे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.
0000