a52a59f7a8cb4dfb95
—————————————————————— एन . ई . एस . हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज निमसाखर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . त्यावेळी प्रमुख अतिथी मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी चेतना फाउंडेशन चे चेतना कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश वाटप करण्यात आले . त्यावेळी चेतना फाउंडेशन चे सचिव प्राध्यापक विलास भोसले उपस्थित होते तसेच निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री धनंजय सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांतराव रणवरे, प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर उपस्थित होते. त्यावेळी निमसाखर ग्रामपंचायत सर्व सदस्य जेष्ठ मंडळी विविध सोसायटींची आजी-माजी चेअरमन, सदस्य, निमसाखर गावचे ग्रामस्थ, पालक वर्ग उपस्थित होते. त्यावेळी चेतना फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक विलास भोसले यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन संस्कृतीक विभागाने केले. आभार प्रदर्शन वैभव हणमंते. सरांनी केले . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!