चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मान्यता

img 20230820 wa0043
शासन नियमानुसार प्रवेश

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी, इंदापूर, पुणे . येथे 2023-24 या शैक्षणिक वर्षात बी .फार्मसी नवीन कॉलेज सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. बी .फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या नावाने कॉलेज सुरू होत असल्याची माहिती चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय उदय सदाशिव देशपांडे यांनी दिली तसेच सचिव विलास नामदेव भोसले म्हणाले सरडेवाडी येथे नव्याने सुरू होत असलेल्या बी .फार्म अभ्यासक्रमासाठी 60 जागांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालच्या नियमानुसार शासनाच्या सीईटीच्या गुणवत्ता यादीनुसार सुरू आहे. या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सोमवार पासून चालू झाली असून DTE Code-16103 आहे. बी .फार्म अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे ( रायगड )या विद्यापीठाशी संलग्नित आहे. खजिनदार सोमनाथ पाडुरंग माने म्हणाले की मुलांना उत्तम प्रकारचे शिक्षण देण्यासाठी चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सतत कार्यरत राहील.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!