🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 14 ऑगस्ट 2023 रोजी ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा.सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर व मा. प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
सरडेवाडी येथील सर्व घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करून ‘ 🇮🇳हर घर तिरंगा 🇮🇳’ मोहीम राबवण्यात आली. सरडेवाडी मधील लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व सांगण्यात आले .यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये खबाले सर, भुजबळ सर, प्रांजली मॅडम, फौजिया मॅडम ,पुनम मॅडम, प्रियंका मॅडम, देशमाने मॅडम, हर्षदा मॅडम उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून ‘🇮🇳हर घर तिरंगा🇮🇳’मोहीम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडली.