
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे आज 12 ऑगस्ट 2023 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या वेळी माननीय अध्यक्ष उदय देशपांडे सर , माननीय सचिव विलास भोसले सर, माननीय खजिनदार सोमनाथ माने सर व माननीय मुख्याध्यापिका निकिता माने मॅडम उपस्थित होते. स्कूलच्या मुख्याध्यापिका निकिता माने मॅडम यांच्या हस्ते अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पहिली ते चौथी च्या व अकरावी ज्युनिअर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना सांगितल्या तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिन (Independence day) व अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी माझा आदर्श(My Role Model) या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला . या कार्यक्रमाच्या वेळी प्रांजली मॅडम ,फौजिया मॅडम , पुनम मॅडम, प्रियंका मॅडम व हर्षदा मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा शेवट प्रांजली मॅडमच्या आभार प्रदर्शनाने झाला.