चेतना फाउंडेशन संचलित, चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी, विषय:- लोकमान्य टिळक पुण्यतिथी , व शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

img 20230801 wa0007
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त तसेच शाहिर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त

विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
मा. अध्यक्ष उदय देशपांडे सर
सचिव मा.विलास भोसले सर
प्रिन्सिपल निकिता माने मॅडम , खजिनदार सोमनाथ माने सर व प्रमुख पाहुणे गवळी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. तसेच अध्यक्ष व माननीय सचिव विलास भोसले सर यांनी लोकमान्य टिळकांच्या सामाजिक शैक्षणिक राजकीय जीवनावर आपले विचार व्यक्त केले. ते सांगतात बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी रत्नागिरी मधील चिखल गावी झाला. स्वातंत्र्यासाठी लढणारी जी अनेक रत्ने होती त्यातील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नाव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. वडिल शिक्षण खात्यात सेवक होते. लहानपणी आई वारल्याने संगोपन चुलतीनेच केले. वडिलांची पुणे येथे बढती मिळाल्याने बदली झाला. वडिलांचे छत्र १९ यावर्षी हरपले. सोळाव्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा झाल्याने टिळकांचे लग्न सतराव्या वर्षी झाले. उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना पदवीधर होण्यासाठी पैशांची फारशी अडचण भासली नाही. १८७६ सली टिळक बी .ए ची परीक्षा गणित घेऊन पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांनी ‘केसरी’व ‘मराठी’ ही वृत्तपत्रे सुरू केली. तसेच ते जहाल गटाचे नेतृत्व करत होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात केलेली कामगिरी आणि अखिल भारतीय काँग्रेस या संघटनेची स्थापना महत्वपूर्ण आहे. तसेच ते भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेते होते. बाळ गंगाधर टिळकांनी गणेश उत्सव व शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली व समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच”
हे ब्रीद वाक्य उच्चारले अशाप्रकारे लोकमान्य टिळकांच्या शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय जीवनाविषयी थोडक्यात परिचय करून दिला. व आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुलांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्याविषयी भाषण दिले. यावेळी प्रा.हर्षदा चौधरी मॅडम, प्रा.अश्विनी देशमाने मॅडम, प्रा.पुनम सरडे मॅडम, प्रा.फौजीया पठाण मॅडम, प्रियंका मारकड मॅडम, प्रा.अमोल भुजबळ सर, सुयोग देवकर सर ,राणी मॅडम, नितीन शिरतोडे, सतीश शेंडगे हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक फौजीया पठाण मॅडम यांनी केले. प्रा. प्रांजली सुतार मॅडम व प्रा. कैलास खबाले सर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य निकिता माने मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम” या गीताने झाली.त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले