चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाचा अनोखा जल्लोष

img 20230815 wa0037(1)
चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे 15 ऑगस्ट 2023 भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मा.अध्यक्ष उदय देशपांडे सर , मा.सचिव विलास भोसले सर, मा.खजिनदार सोमनाथ माने सर विशेष उपस्थित होते. स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात आठ वाजता झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.तुकाराम चोपडे, सौ.रुक्मिणी चोपडे ,

, श्री.भाग्येश जावळे (कक्ष अधिकारी मुंबई मंत्रालय) व माजी सैनिक श्री.देविदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर प्रांजली मॅडम यांनी आपल्या भाषणातून प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित पालक वर्गाचे स्वागत केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले. स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांनी स्वातंत्र्य दिना विषयी माहिती सांगितली. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य नृत्य व भाषणाच्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून प्रमुख पाहुणे व पालक मंडळी मंत्रमुग्ध झाले. स्कूलच्या प्रिन्सिपल मा. निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर असे स्किट सादर केले. ज्यातून विद्यार्थ्यांनी सर्वांना सर्वधर्म समभाव याचा संदेश दिला . ते पाहून सर्व प्रेक्षक वर्ग भारावून गेला. एकंदरीत सर्वांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजिया मॅडम व प्रांजली मॅडम यांनी केले. तसेच पुनम मॅडम , प्रियंका मॅडम ,अश्विनी मॅडम ,हर्षदा मॅडम,खबाले सर ,भुजबळ सर ,देवकर सर ,शिरतोडे सर ,यांनी आपापल्या कार्यक्रमातील जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या .संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडावा यासाठी सर्व शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मनापासून योगदान दिले. संजय कूलकर्णि,
रवि हलजगीकर उपस्थित होते, हलजगीकर यांनी मार्गदर्शन केले,
सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा शेवट फौजिया मॅडमच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳