व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84 किंवा +62 नंबरवरून कॉल येत असल्यास त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा.*

*👉🟥🟥👉व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांदा परदेशी क्रमांकावरून कॉल येत असतात. परंतु, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या कॉल्स किंवा मेसेजला उत्तर दिल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.काही काळापूर्वी लोकांनी ट्विटरवर याबद्दल तक्रार केली होती की त्यांना परदेशी नंबरवरून कॉल येत आहेत. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने एक निवेदन जारी करून युजर्सना अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. तुम्हालाही अनोळखी नंबरवरून मेसेज किंवा कॉल येत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.*

*👉🟥🟥👉बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना मलेशिया, केनिया, व्हिएतनाम आणि इथिओपियासारख्या देशांमधून कॉल येत आहेत. जर तुम्ही नवीन सिम घेतले असेल तर हे कॉल्स आणखी येतात. या कॉल्सचा उद्देश काय आहे हे सध्या तरी कळलेले नाही. व्हॉट्सअ‍ॅपने लोकांना आवाहन केले आहे की जर त्यांना परदेशी नंबरवरून कॉल आले तर त्यांनी ताबडतोब ब्लॉक करून कळवावे. जेणेकरून कंपनी असे नंबर प्लॅटफॉर्मवरून काढून टाकू शकेल.यासोबतच कंपनीने सांगितले की, ते एआयच्या माध्यमातून असे नंबर ओळखण्यावर काम करत आहेत. जेणेकरून ते ब्लॉक केले जाऊ शकतील. त्यांनी मे महिन्यात प्लॅटफॉर्मवरून 65 लाखांहून अधिक नंबर काढून टाकली आहेत.*

*👉🛑🛑👉असे करा परदेशी क्रमांक त्वरित ब्लॉक*

*तुम्हाला कधीही परदेशी नंबरवरून संदेश किंवा कॉल आल्यास, त्यास त्वरित ब्लॉक करा आणि तक्रार करा. ब्लॉक करण्यासाठी त्या नंबरच्या चॅट विभागात जा आणि वर दर्शविलेल्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करून ब्लॉक पर्याय निवडा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सेटिंगमध्ये जाऊनही हे काम करू शकता. याशिवाय तुम्ही अ‍ॅपमध्ये अनोळखी नंबरसाठी दुसरी सेटिंग ऑन करू शकता. तुम्ही हे सेटिंग चालू करताच, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आपोआप सायलेंट होतील आणि तुम्हाला अनावश्यक कॉल्स अटेंड करावे लागणार नाहीत.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!