ई-टेंडर आणि जेम पोर्टल विषयी प्रशिक्षण सत्राचे आयोजन
पुणे, दि. २१: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत ई-टेंडर आणि जेम पोर्टल विषयी प्रशिक्षण सत्राचे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेटजवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे येथे उद्या सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ई-टेंडर भरणे, ई टेंडर पाहणे, बीओक्यू प्रक्रिया, ई टेंडर डाऊनलोड करणे, टेंडर संकेतस्थळावर नोंदणी करणे, आवश्यक सॉफ्टवेअर, डिजिटल स्वाक्षरी, टेंडर प्रक्रिया, बिडींग प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे, आयात निर्यात परवाना, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, उद्यम नोंदणी, दुकान कायदा परवाना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार योजना, आयकर, वस्तु व सेवा कर, टी.डी.एस, जेम पोर्टल बिडिंग जेम पोर्टलवर उत्पादनाची नोंदणी याबाबत तांत्रिक आणि उद्योजकता विषय बाबत तज्ज्ञ व अधिकारी यांच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.
ई-टेंडर आणि जेम पोर्टल तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम यशस्वीरीत्य पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागीय कार्यालय पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
इच्छुक उद्योजकांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कृषी महाविद्यालय परिसर, म्हसोबा गेटजवळ, गणेश खिंड मार्ग, शिवाजीनगर, पुणे तसेच कार्यक्रम संघटक विकास शिंदे (९८३४३२१७०४) यांच्याशी संपर्क साधावा, असेही केद्रांचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांनी कळविले आहे.