राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सभेला गुंडांची सभा असे आक्षेपार्ह, असंविधानिक विधान केले होते. या वक्तव्याचा निषेध व्यक्त आ.भरणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इंदापूर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत (दि.31) केली.

इंदापूर चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दि. 29 मार्च रोजी इंदापूर येथील सभेत बोलताना भाजप च्या 26 मार्च रोजीच्या सभेवर टीका करताना भाजप ची सभा ही गुंडाची सभा होती. अशा प्रकाराची टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा स निषेध करीत समाचार घेत आमचा पक्ष गुंडांचा वाटतो तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांचा, कमिशनवाल्यांचा का असा पलटवार दीपक काटे यांनी केला.

भाजपच्या सभेत उपस्थितांनी भाषणाला टाळ्या वाजवणे हा काय इंदापूरकरांचा गुन्हा आहे का? असा सवाल करीत आम्ही मांडलेले मुद्दे लोकांना पटल्यानेच त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. परंतु तुम्ही केलेल्या टीकेला उपस्थितांनी का टाळ्या वाजवल्या नाहीत असा सवाल आ. भरणे यांना काटे यांनी केला.

भाजपचे आमदार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो
बॅनर वर टाकून स्वतःची जाहिरात करायचा केविलवाणा प्रयत्न आ. भरणे यांनी केला आहे. तसेच आ. चंद्रकांत पाटील यांचा फोटो न विचारता चोरून लावला याच्यातूनच त्यांच्या पक्षाची संस्कृती जनतेसमोर आल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.

धर्माचे रक्षण करणे ही गुंडगिरी असेल तसेच गोहत्या थांबावी म्हणून प्रयत्न करणे ही जर गुंडागिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही स्वाभिमानाने करू. टगेगिरी करणाऱ्या नेत्यांचे जोडे उचलून आमदारकी मिरवणाऱ्या आमदाराला काय धर्म, स्वाभिमान कळणार असा टोलाही काटे यांनी आ. भरणे यांना लगावला.

आ. भरणे यांनी तात्काळ त्यांचे विधान माघारी घ्यावे अन्यथा त्यांना या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील असे सांगून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने
आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दीपक काटे यांनी यावेळी दिला.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!