पुणे:- रामवर्मा आसबे

भारतीय जनता पक्ष , महिला आघाडी , कोथरुड विभाग आणि नीता केअर फऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी आयोजित ” व्यक्तिमत्व विकास ” या कार्यक्रमात बोलताना सौ. पल्लवीताई गाडगीळ ( उपाध्यक्ष भा. ज. पा. महिला आघाडी, कोथरुड विभाग , संस्थापक अध्यक्ष नीता केअर फाऊडेशन) यांनी हे उदगार काढलेदि. 28 सप्टेंबर 2022 रोजी नीता केअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून वनाज परिवार विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 8 वी च्या 100 विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून आपल्या स्वतःची शक्ती उजागर करण्यासाठी 2 सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या सत्रात नीता केअर फाउंडेशनच्या संचालिका आदरणीय सौ पल्लवी ताई गाडगीळ यांनी दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांद्वारे व्यक्तीमत्व विकास साधण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीसंत सेवा संघाच्या महाविद्यालयीन प्रमुख सौ मुग्धा मंगेश पंडित यांनी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीतील पसायदान आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयावर प्रवचन सादर केले. सर्वच विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रांना भरभरून प्रतिसाद दिला. पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम आयोजित करावे अशी सर्वांनी विनंती केली.
या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ अनिता दारवटकर यांनी खूप सहकार्य केले.*सौ. पल्लवी समीर गाडगीळ*
उपाधक्षा- भाजपा कोथरूड.
संस्थापक अध्यक्ष – नीता केअर फाउंडेशन.
अध्यक्ष -सत्यमेव जयते फाउंडेशन.पुणे
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र , निमंत्रित कार्यकारिणी सदस्य ,संघटक सचिव

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!