*जनकल्याणाच्या योजना-१७*
*शबरी आवास योजना*

पुणे:- रामवर्मा आसबे
अदिवासी उप योजनेंतर्गत अदिवासी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच अदिवासी बाह्य क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना आहे.

*योजनेसाठी अटी*
■ लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आला असून अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येते.
■ लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे.
■ लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्यांच्याकडे पक्के घर नसावे.
■ लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रूपये आहे.
■ लाभार्थी सामाजिक,आर्थिक व जात सर्वेक्षण प्राधान्य क्रम यादीच्या निकषा बाहेरील असावा.

*योजनेअंतर्गत लाभ*
■घरकुलासाठी प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान-१ लाख २० हजार रूपये, नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी १ लाख ३० हजार
■ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ९० दिवसांचा रोजगार व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये अनुदान
■प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांस दिल जाणारे अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.

*अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पुणे*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!