अध्यात्मिक बाराखडी

*अ* : अशुद्ध अंतकरण शुद्ध असावे.
*आ*: आत्मा कुणाचाही दुखवू नये.
*इ* : इच्छाशक्ती प्रबळ असावी.
*ई* : इमानदारीने काम करावे.
*उ*: उपकार कुणाचाही घेऊ नये.
*ऊ* : ऊठसूट कुणाकडे धावू नये.
*ए* : ऐतखाऊ बनून जगू नये.
*ऐ* : ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.
*ओ* : ओझे कुणावरही होऊ नये.
*औ* : औकात कृतीतून सिद्ध करावी.
*अं* : अंदाजे तर्क – वितर्क करु नये.
*अ:* : अ:! वा शब्द बोलावेत.
*क* : कपट मनी कधी नसावे.
*ख* : खरं तेच आपलं म्हणावं.
*ग* : गर्व,अहंकार करु नये.
*घ* : घमेंड कशाचीही करु नये.
*च* : चमचेगिरी करु नये.
*छ* : छळ कुणाचाही करु नये.
*ज* : जपून जपून शब्द वापरावेत.
*झ* : झऱ्यासारखं निर्मळ असावं.
*ट* : टणक असावे पोलादासारखे.
*ठ* : ठकास नेहमी महाठक असावे.
*ड* : डर मनात बाळगू नये.
*ढ* : ढगांसारखंच प्रेम बरसावं.
*ण* : ण…ऐकणाऱ्यांस शिकवू नये.
*त* : तक्रार करुनी जगू नये.
*थ* : थंडपणा कामात असू नये.
*द* : दगडासारखा निर्दयी असू नये.
*ध* : धनांत लालच असू नये.
*न* : नम्रशब्दातून मन जिंकावे.
*प* : पटकन हो – नाही म्हणू नये.
*फ* : फजिती कुणाची करु नये.
*ब* : बडबडीपेक्षा कृती करावी.
*भ* : भय मनात बाळगू नये.
*म* : मजबुरीचा फायदा घेऊ नये.
*य* : यशासाठी मनी तळमळ असावी.
*र* : रंग सरडयासम बदलू नये.
*ल* : लबाड संगत करु नये.
*व* : वजन कृतीतून सिद्ध करावे.
*श* : शहाणपणाने जीवन जगावे.
*ष* : षडयंत्र कधी रचू नये.
*स* : सहनशक्ती अंगी असावी.
*ह* : हसून उपहास करु नये.
*ळ* : लबाळपणाने जगू नये.हे
*क्ष* : क्षमा, मन-हृदयातून करावी.
*ज्ञ* : ज्ञान परिसाला अखंड स्मरावे

*🦚🦚🦚*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो…..!!!*

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःचा व परिवाराचा जीव वाचवा…!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*.

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!